(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
पंजाबी सुपरस्टार दिलजीत दोसांझने २०२५ च्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये “सर्वोत्तम अभिनेत्याचा अभिनय” या श्रेणीत नामांकन मिळवून देशाला अभिमान वाटेल असे काम केले आहे. नेटफ्लिक्सच्या “अमर सिंग चमकिला” या चरित्रात्मक नाटकातील त्याच्या दमदार अभिनयासाठी हे नामांकन मिळाले आहे. या चित्रपटात, दिलजीतने पंजाबी गायक अमर सिंग चमकिलाची भूमिका साकारली होती, जे त्यांच्या धाडसी गाण्यांमुळे आणि दुःखद निधनामुळे चर्चेत आले होते. इम्तियाज अली दिग्दर्शित, १२ एप्रिल २०२४ रोजी हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला. चित्रपटामध्ये दिलजीतसोबत परिणीती चोप्रा देखील दिसली होती.
दिलजीत दोसांझ यावर्षी डेव्हिड मिशेल, ओरिओल प्ला आणि दिएगो वास्क्वेझ सारख्या आंतरराष्ट्रीय कलाकारांशी स्पर्धा करत आहे. त्याचे नामांकन भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक मोठी कामगिरी मानली जात आहे, कारण त्यावरून असे दिसून येते की प्रादेशिक कथा आता जागतिक मंचावर त्यांचे स्थान मिळवत आहेत. या अभिमानास्पद कामगिरीसाठी अभिनेत्याचं आता कौतुक होत आहे.
‘मिराई’चा बॉक्स ऑफिसवर धमाका, १३व्या दिवशीही कमाईचा जोर कायम!
या खास व्यक्तीला नामांकनाचे श्रेय
२०२५ च्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्तम अभिनेत्याचा अभिनय’ या श्रेणीत नामांकन मिळाल्यानंतर, गायक आणि अभिनेता दिलजीतने इन्स्टाग्रामवर लिहिले, “हे सर्व इम्तियाज अली सरांमुळे आहे!” दिलजीतच्या पोस्टमुळे चाहते आणि सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव झाला. आणि अभित्याने त्याच्या नामांकनाचे क्षेय चित्रपटाचे दिग्दर्शक इम्तियाज अली यांना दिले आहे.
या चित्रपटात परिणीती चोप्राने चमकिलाची पत्नी अमरजोतची भूमिका साकारली होती, तर ए.आर. रहमान यांच्या संगीताने चित्रपटाला आणखी खास बनवले होते. या चित्रपटाचे जगभरात कौतुक झाले आणि दिलजीतच्या अभिनयाचे “करिश्माई आणि प्रामाणिक” म्हणून कौतुक झाले.
“मी माझ्या मुळांशी जोडलेला आहे” – दिलजीत दोसांझ
दिलजीतने एका मुलाखतीत म्हटले होते की, “मी माझ्या मुळांशी जोडलेलो आहे आणि तीच माझी सर्वात मोठी ताकद आहे. चमकिलासारखी भूमिका साकारून मला जगाला पंजाबी संगीताची खरी भावना दाखवायची होती.” असे म्हणून अभिनेत्याने आपले मत मांडले. आता याच चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळवून अभिनेता देखील खुश झाला आहे.
‘अमर सिंग चमकिला’ का प्रसिद्ध झाला
फॅक्टरीची नोकरी सोडून आपल्या धाडसी आणि बंडखोर गाण्यांनी स्टार बनलेल्या अमर सिंग चमकिलाला यांनी वयाच्या २७ व्या वर्षीच निधन झाले. आणि त्यांच्या या बातमीमुळे सगळीकडे खळबळ पसरली. त्यांची हत्या करण्यात आली. यापूर्वी, नेटफ्लिक्सच्या “दिल्ली क्राइम्स” ने २०२० मध्ये सर्वोत्कृष्ट नाटक मालिकेसाठी आंतरराष्ट्रीय एमी जिंकला होता.