(फोटो सौजन्य - अकाउंट)
बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख असलेला प्रसिद्ध अभिनेता इमरान हाश्मी त्याच्या आगामी चित्रपटात बीएसएफ कमांडरची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचे नाव ‘ग्राउंड झिरो’ हे आहे. एक्सेल एंटरटेनमेंटने ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाची घोषणा केल्यापासून, या चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा चित्रपट देशासाठी आणि राष्ट्राचे रक्षण करणाऱ्यांच्या बलिदानावर आधारित असणार आहे. एक्सेल एंटरटेनमेंटने आता चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. पोस्टरमध्ये इमरान हाश्मी दिसत आहे. अभिनेता इमरान हाश्मीला पाहून चाहते चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा १४ मिनिटांचा खाजगी व्हिडिओ झाला लीक; कोण आहे ‘ही’ २४ वर्षीय अभिनेत्री?
‘ग्राउंड झिरो’ होणार या दिवशी प्रदर्शित
एक्सेल एंटरटेनमेंटने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. हे पोस्टर ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाचे आहे. यामध्ये इमरान हाश्मी पाठमोरा उभा राहिलेला दिसत आहे. इमरान हाश्मीने टी-शर्ट घातला आहे आणि हातात बंदूक धरली आहे. पोस्टरमध्ये इमरान हाश्मी खूप उत्साही दिसत आहे. पोस्टरच्या कॅप्शनमध्ये ‘काश्मीरला कायमचे बदलणाऱ्या मोहिमेची अनकहीत कहाणी’ असे लिहिले आहे. त्यात पुढे म्हटले आहे की हा चित्रपट २५ एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
काय आहे ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाची कथा?
‘ग्राउंड झिरो’च्या नवीन पोस्टरमध्ये लिहिले आहे की, ‘तुझे लाई यहां तेरी मौत फौज, कश्मीर का बदला लेगा गाजी.’ असे लिहिलेले दिसत आहे. ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटात इमरान हाश्मी बीएसएफचे डेप्युटी कमांडंट नरेंद्र नाथ दुबे यांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाच्या कथेनुसार, तो दोन वर्षे राष्ट्रीय सुरक्षेला असलेल्या धोक्याची चौकशी करताना दिसणार आहे. ‘ग्राउंड झिरो’ मध्ये अॅक्शनसोबतच मनोरंजक कथाही दाखवली जाणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी व्यतिरिक्त सई ताम्हणकर आणि मुकेश तिवारी यांच्याही भूमिका पाहायला मिळणार आहे.
इमरान हाश्मीने लोकांसोबत साजरा केला वाढदिवस
इमरान हाश्मीने २४ मार्च रोजी त्याचा वाढदिवस त्याच्या चाहत्यांसोबत आणि पापाराझींसोबत साजरा केला. त्याच दिवशी त्यांनी त्यांच्या ‘आवारापन’ चित्रपटाचा दुसरा भाग ‘आवारापन २’ ची घोषणा केली होती. इमरान हाश्मीने त्याच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर एक व्हिडिओ शेअर करताना असेही सांगितले की हा चित्रपट ३ एप्रिल २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्याचे चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.