फोटो सौजन्य - Social Media
या घटनेनंतर कोलकाता पोलिसांच्या होमिसाईड विभागाने घटनास्थळाची पहाणी केली आहे. हे प्रकरण नक्की अपघात होता की कटकारस्थान की आणखीन काही? याचा तपास सुरु करण्यात आला आहे. त्यांच्या शवाचे शवविच्छेदन 28 मे रोजी करण्यात येणार आहे. तसेच उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येईल.
Anik Dutta यांनी २०१२ मध्ये Bhooter Bhabishyat या हॉरर-कॉमेडी चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यांनी दिग्दर्शनासोबतच कथा आणि पटकथा लेखनाची जबाबदारीही सांभाळली होती. त्यानंतर त्यांनी Astonishing Lamp, Meghnadbodh Rohoshyo, Bhobishyoter Bhoot, Borunbabur Bondhu, Aparajito आणि Joto Kando Kolkatatei यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
विशेष म्हणजे Aparajito या चित्रपटासाठी त्यांनी दिग्दर्शकासोबत गीतकार आणि प्लेबॅक सिंगर म्हणूनही काम केले होते. या चित्रपटाला २०२२ मध्ये राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सध्या ते या चित्रपटाच्या दुसऱ्या भागावर काम करत होते. मात्र त्यांच्या अचानक निधनामुळे हे काम अधुरे राहिले आहे. त्यांच्या निधनामुळे बंगाली चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली असून, अनेक कलाकार आणि चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.






