(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
आदित्य धर दिग्दर्शित स्पाय अॅक्शन थ्रिलर ‘धुरंधर’ हा चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. रणवीर सिंगने ‘धुरंधर’ या चित्रपटात आपल्या अभिनयाने सर्वांना प्रभावित केले आहे. या चित्रपटाने थिएटरमध्ये खूप चर्चा निर्माण केली आहे. रणवीरसोबत अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि सारा अली खान यांच्याही महत्त्वाच्या भूमिका पाहायला मिळाल्या आहेत. या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटातील सर्वात प्रशंसित अभिनेता अक्षय खन्ना आहे. फराह खान देखील अक्षय खन्नाच्या अभिनयाची चाहती बनली आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट अक्षयच्या भूमिकेमुळे जास्त आवडला आहे. त्याच्या अभिनयाने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
अक्षय खन्ना या चित्रपटात रहमान नावाच्या एका दरोडेखोराची भूमिका साकारत आहे. त्याच्या भूमिकेला सर्वाधिक प्रशंसा मिळाली आहे आणि तो चित्रपटातील सर्वात मोठा आकर्षण अभिनेता बनला आहे. त्याच्या कामाचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. प्रत्येकजण म्हणत आहे की ते फक्त अक्षयसाठी हा चित्रपट पाहणार आहेत. त्याचे काम त्याचा भूमिकेतील आकर्षित अंदाज हे सगळं चाहत्यांना खूप आवडला आहे. आता बॉलीवूडमधील फराह खान यांना देखील अक्षय खन्नाचा अभिनय आवडला आहे. तसेच, ‘तो ऑस्कर पुरस्काराला पात्र आहे’ असे देखील त्यांनी म्हटले आहे.

फराह खानने अक्षयचे केले कौतुक
रहमानची चित्रपटातील एन्ट्री एका गाण्याने सुरू होते. आता, त्याचा एन्ट्री सीन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे गाणे आता एक वेड लावणारे बनले आहे. लोक त्याचा एन्ट्री सीन क्लिप करून सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या यादीत फराह खानही सामील झाली आहे. फराहने अक्षयचे कौतुक केले आहे. तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये धुरंधर मधील अक्षय खन्ना आणि तीस मार खानचा अक्षय कुमार दोन्ही व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडिओवरील कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, “धुरंधरमध्ये अक्षय खन्नाला रहमान डकैतच्या भूमिकेत पाहिल्यानंतर, सर्वजण…” शेवटी, फराहने लिहिले, “अक्षय खन्ना ऑस्करला पात्र आहे.”
Dhurandhar Movie: २२ वर्षीय तरुणाने ७२ तास जागून ‘धुरंधर’चा टीझर केला तयार, यामी गौतमशी आहे खास नात
चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच होणार प्रदर्शित
आदित्य धर यांनी पहिल्या भागाच्या शेवटी खुलासा केला की ते चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित करणार आहेत. “धुरंधर” चा दुसरा भाग १९ मार्च २०२६ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जो पाहण्यासाठी चाहते आता खूप उत्साहित आहेत. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसला आहे. चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टने जबरदस्त काम केले आहे. तसेच चित्रपटामधील सगळी गाणी देखील चर्चेत आहेत.






