(फोटो सौजन्य - अकाउंट)
टॉलिवूड सुपरस्टार अजितचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘गुड बॅड अग्ली’ चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. चाहत्यांमध्ये याबद्दल बरीच चर्चा सुरु झाली आहे. अपेक्षेनुसार, हा ट्रेलर खळबळजनक ठरला आणि तमिळ चित्रपट उद्योगात एक नवा विक्रम या चित्रपटाने रचला आहे. तसेच प्रेक्षकांना या चित्रपटामध्ये तंगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. याचदरम्यान चित्रपटाची कथा आणि स्टारकास्ट पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे.
Rashmika Bday : संघर्ष आणि गरिबीत गेले रश्मिकाचे बालपण, अभिनयाच्या कारकिर्दीत होता कुटुंबाचा विरोध!
‘गुड बॅड अग्ली’ ने व्ह्यूजच्या यादीत मिळवले अव्वल स्थान
‘गुड बॅड अग्ली’ च्या ट्रेलरला २४ तासांत ३२ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे. यासह, हा तमिळ चित्रपटसृष्टीच्या इतिहासात पहिल्या दिवशी सर्वाधिक पाहिलेला थिएटर ट्रेलर बनला. पहिल्या दिवशी या चित्रपटाचे ट्रेलरने सर्वाधिक पाहिलेल्या पाच तमिळ ट्रेलरना मागे टाकले आहे, ज्यात ‘लिओ’ (₹३.१० कोटी), ‘थुनिवु’ (₹३.९ कोटी), ‘बीस्ट’ (₹२.७ कोटी) आणि ‘द गोट’ (₹२.४२ कोटी) यांचा समावेश आहे. हा ट्रेलर रिलीज झाल्यापासून युट्यूबवर ट्रेंडिंगमध्ये आहे. आणि चाहते त्याला भरभरून प्रतिसाद देत आहे.
या चित्रपटाशी अनेक मोठी नावे जोडलेली आहेत
या चित्रपटात अजितसोबत त्रिशा कृष्णन देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ‘गुड बॅड अग्ली’ हा चित्रपट अधिक रविचंद्रन यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट मैत्री मूव्ही मेकर्सच्या बॅनरखाली बनवले आहे. चित्रपटाचे संगीत जी.व्ही. प्रकाश कुमार यांनी दिले आहे, ज्यामुळे हा मोठा बजेटचा अॅक्शन चित्रपट आणखी धमाकेदार होणार आहे. हा चित्रपट १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. जो प्रेक्षकांना लवकरच सिनेमागृहात पाहता येणार आहे.
ऋषी कपूर यांनी ज्याला टॅलेंटवरून हिणवलं होतं, आज तो बनला त्यांच्यापेक्षा मोठा स्टार…
अजित कुमार ‘विदामुयार्ची’ मध्ये दिसला
कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, अजित कुमार यापूर्वी ‘विदामुयार्ची’ या चित्रपटामध्ये नुकताच दिसला होता. हा चित्रपट देखील प्रेक्षकाना खूप आवडला. या चित्रपटात त्याच्यासोबत त्रिशा देखील दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नाही. आणि आता अभिनेत्याचा ‘गुड बॅड अग्ली’ हा चित्रपट काय धमाल करतो हे पाहणे उत्कंठाचे ठरणार आहे.