(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
‘छावा’ चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान, विकी कौशलने सांगितले होते की त्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर विकीला त्याच्या मेहनतीचे फळ मिळत आहे. ‘छावा’ चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले आहे. चौथ्या दिवशी या चित्रपटाने किती कमाई केली आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत.
चित्रपटाने चौथ्या दिवशी केली एवढी कमाई
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ‘छावा’ चित्रपटाने चौथ्या दिवशी २४.०० कोटी रुपये कमावले आहेत. तिसऱ्या दिवसापेक्षा हे कलेक्शन कमी आहे परंतु रात्रीच्या शोनंतर हे कलेक्शन आणखी वाढू शकते. हा चित्रपट सिनेमागृहात चांगलाच धुमाकूळ घालत आहे. तसेच हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडलेला दिसत आहे.
‘छावा’ व्यतिरिक्त ‘हे’ ऐतिहासिक चित्रपटही सापडले होते वादात, तरीही बॉक्स ऑफिसवर मालामाल
आतापर्यंतची एकूण कमाई
‘छावा’ चित्रपटाच्या एकूण कमाईबद्दल बोलायचे झाले तर ती १४०.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. रविवारीच हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता. हा विकी कौशलचा एकल चित्रपट आहे, जो इतक्या लवकर १०० कोटी क्लबमध्ये दाखल झाला आहे. या बाबतीत या चित्रपटाने ‘स्काय फोर्स’ चित्रपटालाही मागे टाकले आहे. आणि प्रेक्षकांच्या मनात अव्वल स्थान निर्माण केले आहे.
मराठ्यांच्या शौर्याची गाथा प्रेक्षकांनी पसंत केली
‘छावा’ हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे, चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्यात अनेक कमतरता जाणवल्या. पण प्रेक्षकांना विकी कौशलचा अभिनय आणि मराठ्यांच्या शौर्याची कहाणी जास्त आवडली. म्हणूनच चौथ्या दिवशीही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला कलेक्शन करत आहे. आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.
चित्रपटातील स्टारकास्ट
‘छावा’ चित्रपटात विकी कौशल व्यतिरिक्त रश्मिका मंदान्ना देखील आहे. ती छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर आशुतोष राणा, दिव्या दत्ता, प्रदीप राम सिंह रावत, संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, डायना पेंटी हे कलाकारही या चित्रपटात आहेत. तसेच, अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत दिसत आहे. अभिनेत्याचा लूक चाहत्यांना खूपच आवडला आहे.