(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ॲमेझॉन एमएक्स प्लेयरने आज नुकताच आय-पॉपस्टार या साप्ताहिक म्युझिक रिअलिटी सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. अशाप्रकारच्या पहिल्या म्युझिक टॅलेंट हंटमधे खरेपणा आणि सर्जनशीलता यांचा मेळ घालण्यात आला आहे. या शोमध्ये देशभरातील १२ संगीतकार सहभागी होऊन पॉप, रॅप, ईडीएम, रॉक आणि आर अँड बी सादर करणार आहेत. त्याला हिंदी, पंजाबी, हरियाणवी आणि गुजरातीसारख्या प्रादेशिक भाषेची जोड असेल. सहा आठवड्यांत २५ स्पर्धक ऑडिशन्स देतील आणि त्यातील १२ जण या राउंडसाठी निवडले जाणार आहेत. त्यानंतर होणार असलेल्या भव्य अंतिम फेरीत भारताच्या पहिल्या आय- पॉपस्टारचं टायटल जिंकण्यासाठी हे स्पर्धक एकमेकांना टक्कर देणार आहेत.
अर्जुन बिजलानी ठरला Rise and Fall चा विजेता, टीव्ही अभिनेत्याने अरुष भोलाला दिली जबरदस्त टक्कर
याचदरम्यान या शोमध्ये भारतामधील वैविध्यपूर्ण संगीत साजरं केलं जाणार आहे. या शोमध्ये किंग, आस्था गिल, आदित्य रिखारी आणि पर्मिश वर्मा हे सर्व गायक स्पर्धकांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या कामगिरीचं ते मूल्यमापन करतील आणि त्यांना नवी सर्जनशीलता गाठण्यास मदत करतील. कोलॅबरेशन नव्या उंचीवर नेण्यासाठी ॲमेझॉन एमएक्स प्लेयरने वॉर्नर म्युझिक आणि स्पॉटिफाय यांच्याशी म्युझिक पार्टनर म्हणून भागिदारी केली आहे.
रस्क मीडियाचे सीईओ आणि सह- संस्थापक मयांक यादव म्हणाले, ‘रस्क मीडियाने नेहमीच तरुण प्रेक्षकांसाठी काहीतरी वेगळं आणि अस्सल देण्याचा प्रयत्न केला आहे. आय- पॉपस्टारच्या माध्यमातून आम्ही भारताची वैविध्यपूर्ण संगीत संस्कृती एका प्लॅटफॉर्मवर आणत नवे आवाज आणि ध्वनी यांना वाव देण्याचं ध्येय ठेवलं आहे. हा शो फक्त स्पर्धेवर आधारित नाहीये, तर त्यातून भारतातील स्वतंत्र संगीत निर्मितीच्या भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.’
“फराळातला एक पदार्थ तरी आईसोबत बनवायचाच!”, विजया बाबरची दिवाळीची गोड परंपरा
मेंटॉर्सनी भारतीय संगीत क्षेत्रातील नवीन पिढीला मार्गदर्शन करण्याबद्दलची उत्सुकता व्यक्त केली. याबद्दल गायक किंग म्हणाला, ‘आय- पॉपस्टार या शोमध्ये नव्या कलाकरांना, आणि त्यांची कला सादर करायला संधी मिळेल. प्रत्येक स्पर्धक खास आहे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांची सर्जनशीलता, खरेपणा फुलवण्याचा प्रयत्न करू. प्रेक्षकांचा दमदार पाठिंबा त्यासाठी महत्त्वाचा आहे.’ आय- पॉपस्टार हा शो १८ ऑक्टोबरपासून ॲमेझॉन एमएक्सप्लेयरवर मोफत स्ट्रीम होणार असून तुम्ही तो मोबाइल, कनेक्टेड टीव्ही, ॲमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ आणि फायर टीव्ही, एयरटेल एक्स्ट्रीमवर पाहू शकता.