(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दिवाळी हा एक असा सण आहे जो कुटुंब, प्रेम आणि एकत्र येण्याचा उत्सव असतो. दिवाळीचा गोडवा तेव्हाच वाढतो, जेव्हा तो आपल्या प्रियजनांसोबत साजरा करता येतो. झी मराठीवरील ‘कमळी’ मालिकेतील कमळीची भूमिका साकारणारी अभिनेत्री विजया बाबर दिवाळीचा आनंद आपल्या खास पद्धतीने लुटते. शूटिंग मध्ये व्यस्त असूनही ती या सणासाठी वेळ काढते आणि यावर्षी तिला अधिक सुट्ट्या मिळणार असल्याने तिचा उत्साह अधिकच वाढलाय.
विजया दिवाळीच्या काही गोष्टी शेयर करताना म्हणते, “माझं व्यक्तिमत्त्व चिवड्यासारखं आहे ज्यात शेंगदाणे, खोबरं, तिखट, साखरेचा गोडपणा, सगळं काही असतं. अगदी तसेच माझ्यात अनेक गुण आहेत. माझ्या कुटुंबाचं म्हणणं मी एक छोट्या बॉंम्ब सारखी आहे आणि मी ‘छोटा पॅकेट, मोठा धमाका’ आहे!” या गोड आणि रंगीत सणात ती तिच्या कुटुंबासोबत एकत्र येते. विजयाची दिवाळीतील खास आठवण म्हणजे “लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संपूर्ण सोसायटीतील मंडळी एकत्र येऊन फटाके लावणे आणि नंतर सर्व तरुण मंडळी मिळून जेवायला जाणे. ही परंपरा अजूनही न चुकता पाळली जाते. लहानपणी मी खूप खट्याळ होते. दिवाळीत मी फटाके फोडायचे, पण आता मात्र फक्त शगुनाची फुलबाजी लावते आणि सण साजरा करते. दिवाळीपूर्व तयारीत सहभागी होणं हे माझ्यासाठी फार आनंददायक असतं. फराळ करताना सगळं कुटुंब एकत्र येणं हा एक वेगळाच आनंद असतो. आता शुटिंगमुळे वेळ मिळत नाही, पण मी आईला सांगून ठेवले आहे की कमीत कमी एक पदार्थ तरी ठेव, जो मी सर्वांसोबत बसून बनवू शकेन.”
अर्जुन बिजलानी ठरला Rise and Fall चा विजेता, टीव्ही अभिनेत्याने अरुष भोलाला दिली जबरदस्त टक्कर
विजयाचं म्हणणं आहे की, “दिवाळी म्हणजे एकत्र येणं, आठवणींचा गोडवा आणि प्रेमाचं वातावरण. काम कितीही असलं तरी कुटुंबासाठी वेळ काढायलाच हवा.” ती चाहत्यांना असा संदेश देते की, “दिवाळी साजरी करताना पर्यावरणाची काळजी घ्या, प्रेम वाटा आणि जुन्या आठवणींना नव्या रंगात सजवा.”
झी मराठी वाहिनीवर ३० जून २०२५ पासून सुरू झालेली ‘कमळी’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून बसत आहे. विजया बाबर हिने साकारलेली ‘कमळी’ ही भूमिका ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या, पण मोठं स्वप्न पाहणाऱ्या मुलीची कहाणी सांगते. शिक्षण, आत्मभान, आणि समाजाशी झगडत आपलं वेगळं स्थान निर्माण करण्याचा कमळीचा प्रवास या मालिकेतून उलगडतो.
‘डिटेक्टिव धनंजय’ वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस, आदिनाथ कोठारेचा हटके लूक चर्चेत
या मालिकेचा प्रोमो न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकला असून, ती पहिली मराठी मालिका ठरली जी तिथे प्रमोट झाली. हे मराठी मालिकांच्या इतिहासातील एक अनोखं पाऊल ठरलं आहे.