(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
अगदी पहिल्या भागापासूनच ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि पुन्हा एकदा ही मालिका घराघरात पोहोचली आहे. जबरदस्त पकड असलेले कथानक, उत्कृष्ट व्यक्तिरेखा आणि भावनिक सखोलता यामुळे प्रेक्षक विरानी कुटुंबियांमध्ये गुंतून राहतात. तुलसी आणि मिहिरचे नाते, त्यांच्या मुलांपुढे असलेल्या अडचणी आणि आदर्श आणि वास्तव यांच्यातील संघर्ष यामुळे ही मालिका केवळ मनोरंजन करत नाही, तर त्यातील नाती प्रेक्षकांना आपलीशी वाटू लागली आहेत.
तसेच, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये मिहिर आणि तुलसीची मुलगी परिधीचे लग्न ठरल्याचे दाखवण्यात आले आहे. लवकरच परिधी नवीन आयुष्य सुरू करणार आहे. पण हा क्षण आनंदाऐवजी तणावात बदलला आहे.
मिहिर आणि तुलसी यांच्यात होणार संघर्ष
यामागील कारण म्हणजे तुलसी आणि मिहिरमधील मतभेद, ज्यामुळे कुटुंबात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण होते. मिहिर भावनिकदृष्ट्या तुलसीला इशारा देतो की जर परिधीच्या लग्नात काही चूक झाली तर ती त्या सर्वाला जबाबदार ठरेल. मिहिर आणि तुलसी यांच्यातील संघर्ष पाहून कुटुंबातील सदस्य शांत होतात. त्यामुळे कुटुंबातील वातावरण बिघडले आहे. रागाच्या भरात मिहिरने तुलसीला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत , जर परीच्या लग्नात काही विघ्न आले, तर त्याला जबाबदार तुलसी असणार आहे. त्या दोघांमधील हा वाद-विवाद पाहून प्रेक्षकांनाही प्रश्न पडला आहे की तुलसी आता काय करेल?
प्राजक्ता शंभूराजची भन्नाट लव्हस्टोरी! ‘अपघात ते लग्न’ अनोखा, सुंदर अन् फिल्मी प्रवास
तुलसी पहिल्यापासून खूप खंबीर आहे आणि सत्याच्या बाजूने ठामपणे उभी असलेली दिसत आहे. मग त्यात तिचे नुकसान झाले तरीही ती सत्याच्याच बाजूने लढताना दिसणार आहे. मिहिरशी असलेल्या तणावपूर्ण नात्यातून मार्ग काढून आपल्या मुलीचा आनंद जपण्याची मोठी जबाबदारी तिच्यावर आहे. अखेरीस मिहिर देखील तिच्या बाजूने उभा राहील का? आणि परिस्थिती आणखी बिघडू न देता तुलसी परीला स्वतःची बाजू समजावून देऊ शकेल का? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.