(फोटो सौजन्य - अकाउंट)
पृथ्वीराज सुकुमारन यांच्या ‘L 2 Empuraan’ या चित्रपटाने चांगले यश मिळवले आहे. या चित्रपटाने सर्वाधिक कमाई करणाऱ्या मल्याळम चित्रपटाचा विक्रम केला आहे. मल्याळम अभिनेता मोहनलाल अभिनीत हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. कमाईच्या बाबतीत, या चित्रपटाने मल्याळममधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘मंजुम्मेल बॉईज’ चित्रपटाला मागे टाकले आहे. चित्रपटाच्या एकूण कमाईबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत.
‘एल २: एम्पूरान’ मल्याळममध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला
महिरीनुसार, ‘एल २ एम्पुरान’ ने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत १०१.१५ कोटी रुपये कमावले आहेत. या चित्रपटाने पहिल्या दिवशी २१ कोटींची कमाई केली. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ₹८८.२५ कोटींची कमाई केली. तर, दुसऱ्या सोमवारी म्हणजे काल १.५५ कोटी रुपये चित्रपटाने कमावले आहेत. तसेच या चित्रपटाने आज १.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘L2 Empuraan’ या चित्रपटाने जगभरात २५० कोटी रुपये कमावले आहेत असा चित्रपट निर्मात्यांचा दावा आहे. यापूर्वी ‘मंजुम्मेल बॉईज’ या मल्याळम चित्रपटाने जगभरात एकूण २४१ कोटी रुपये कमावले होते. अशाप्रकारे, मल्याळम चित्रपटांमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ‘एल २: एम्पुरान’ ठरला आहे.
अपूर्वा मुखिजा मिळाली अॅसिड हल्ला आणि जीवे मारण्याच्या धमकी; नेटकऱ्यानी केले २ महिने टॉर्चर!
या वादाचा ‘L2 Empuran’ वर परिणाम झाला नाही
‘एल २ एम्पुरान’ हा चित्रपट देखील वादात सापडला आहे. हा चित्रपट गुजरात दंगलींवर आधारित आहे. या चित्रपटात हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे चित्रपटात अनेक सीन कट करण्यात आले आहेत. तथापि, याचा चित्रपटावर कोणताही परिणाम झाला नाही. मोहनलाल आणि पृथ्वीराज सुकुमारन यांच्याशिवाय या चित्रपटात मंजू वॉरियर, सूरज वासुदेव आणि टोविनो थॉमस यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
‘छावा’ ६०० कोटी क्लबमध्ये होणार सामील
विकी कौशल अभिनीत ‘छावा’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर, हा चित्रपट अजूनही प्रेक्षकांना आवडतो आहे. या चित्रपटाने आठव्या मंगळवारी ३५ लाख रुपये कमावले आहेत. चित्रपटाची एकूण कमाई ५९९.१५ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हा चित्रपट ‘L2: Empuraan’ च्या पुढे आहे. आणि अजूनही चांगली कमाई करताना दिसत आहे.
‘Chhaava’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट; नंबर वन रेकॉर्ड करण्यासाठी आहे इतका दूर?
‘सिकंदर’ची सिनेमागृहात वाईट अवस्था
ईदच्या निमित्ताने सलमान खानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट मोठ्या अपेक्षेने प्रदर्शित झाला. पण चित्रपटाला चांगली कामगिरी करता आली नाही. कमाईच्या बाबतीत, हा चित्रपट ‘एल २ एम्पुरान’ पेक्षाही मागे पडला आहे. सलमान खान आणि रश्मिका मंदान्ना अभिनीत या चित्रपटाने पहिल्या दिवशी २६ कोटी रुपये कमावले होते. काल म्हणजेच दुसऱ्या मंगळवारी या चित्रपटाने १.३५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. अशाप्रकारे, चित्रपटाची एकूण कमाई १०५.६० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या चित्रपटाचे बजेट २०० कोटी रुपये आहे.