(फोटो सौजन्य - अकाउंट)
विकी कौशलच्या ऐतिहासिक ड्रामा चित्रपट ‘छावा’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे आणि श्रद्धा कपूरच्या हॉरर-कॉमेडी ‘स्त्री २’ ला मागे टाकले आहे. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता वर्षातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट बनला आहे. शाहरुख खानचा ‘जवान’ अजूनही यादीत अव्वल स्थानावर आहे पण ‘छावा’च्या वेगाने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.
‘छावा’ ६०० कोटींच्या क्लबजवळ
‘छावा’ या चित्रपटाने ५३ दिवसांत ५९८.८० कोटी रुपये कमाई करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता, हा चित्रपट ६०० कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कमाईपासून फक्त २ कोटी रुपये दूर आहे. तर ‘स्त्री २’ ने रिलीज झाल्यानंतर एकूण ५९७.९९ कोटी रुपये कमावले होते. या स्पर्धेत, विकी कौशलच्या चित्रपटाने अंतिम फेरीत बाजी मारली आहे. आणि स्वतःचे अव्वल स्थान निर्माण केले आहे.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे निधन, घडवले ‘या’ बॉलिवूड सेलिब्रेटींचे करिअर!
लवकरच नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार
जर तुम्ही ‘छावा’ चित्रपट सिनेमागृहात पाहू शकला नाही आहेत तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. हा चित्रपट आता येत्या ११ एप्रिल २०२५ पासून नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जाण्याची शक्यता आहे. तथापि, याबद्दल अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. परंतु चित्रपटगृहात कल्ला केल्यानंतर हा चित्रपट नक्कीच ओटीटीवरही धुमाकूळ घालेल यात शंकाच नाही.
‘छावा’ चित्रपटाची कथा
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित, ‘छावा’ हा मराठा शासक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित एक भव्य पीरियड ड्रामा आहे. शिवाजी सामंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटात विकी कौशलने संभाजी महाराजांच्या भूमिकेत आपले पात्र रंगवले आहे. तर, रश्मिका मंदान्ना यांनी राणी येसूबाईची भूमिका साकारली आहे आणि अक्षय खन्नाने औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. चित्रपटाची पार्श्वभूमी, संवाद आणि युद्धाचे दृश्ये प्रेक्षकांना भावनिक करतात. तसेच चित्रपटामधील सगळी गाणी धमाकेदार आहेत.
‘भूमी म्हणजे सौंदर्याची हमी’ फॅशन Queen भूमी पेडणेकरचा हटके अंदाज
‘स्त्री २’ ची कथा आणि स्टारकास्ट
14 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज झालेला ‘स्त्री 2’ हा चित्रपट राजकुमार राव, अभिषेक बॅनर्जी, अपारशक्ती खुराना आणि पंकज त्रिपाठी यांसारख्या स्टार्सचा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे. हा चित्रपट एका भयानक राक्षसाभोवती फिरतो जो चंदेरी शहरात विनाश घडवतो. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला, पण तो ‘छावा’च्या ऐतिहासिक भव्यतेला साजेसा ठरला नाही. या फ्रँचायझीचा पुढील चित्रपट, ‘स्त्री ३’, आता १३ ऑगस्ट २०२७ रोजी प्रदर्शित होणार आहे.
‘जवान’ अजूनही वरच्या स्थानावर
‘छावा’ने मोठी झेप घेतली असली तरी, शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट ६४०.२५ कोटी रुपयांच्या कमाईसह अजूनही अव्वल स्थानावर आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात शाहरुख दुहेरी भूमिकेत होता आणि चित्रपट प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसला. आता जर विकीच्या चित्रपटाने आणखी ४० कोटींची कमाई केली तर तो या चित्रपटाला मागे टाकण्याची शक्यता आहे.