(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
१५ सप्टेंबर २०१५ रोजी जय जगदांबा प्रॉडक्शन्स आणि सुमित म्युझिक कंपनी यांच्यात एक करार झाला. करारानुसार, ‘शांताबाई’ गाण्याचे सर्व मराठी आणि हिंदी अधिकार एकमेव आणि अनन्य हक्क म्हणून जय जगदांबा प्रॉडक्शन्सकडे गेले. सुमित म्युझिक कंपनीने फक्त काही विशिष्ट हक्क स्वतःकडे ठेवले, बाकीचे सर्व अधिकार जय जगदांबा प्रॉडक्शन्सकडे हस्तांतरित केले.शांताबाई गाणे खूप लोकप्रिय आहे, आणि त्याची मागणी प्रेक्षकांमध्ये खूप जास्त आहे.
उल्लंघन आणि व्यावसायिक नुकसान
सुमित म्युझिक कंपनीने गाणे YouTube, Spotify, Jio Saavn, Amazon Prime, Apple Music अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वतःच्या नावाने अपलोड केले आणि PDL सारख्या कॉपीराईट सोसायटीमध्ये नोंदणी करून इतरांना परवाने दिले. यामुळे जय जगदांबा प्रॉडक्शन्सच्या हक्काचे व्यावसायिक नुकसान झाले, ब्रँडची प्रतिमा प्रभावित झाली आणि आगामी चित्रपटातील गाण्याच्या मार्केटिंगला धोका निर्माण झाला.
गर्लफ्रेंड निक्की तांबोळीने अरबाजला ऑन-कॅमेरा झापलं; म्हणाली, ‘खेळाशिवाय तुझं हे काय सुरू …’
कायदेशीर कारवाई
चित्रपटाचे निर्माता संजीव राठोड यांनी कायदेशीर नोटीस पाठवून या उल्लंघनावर कठोर पावले उचलली. सुमित म्युझिक कंपनीने उत्तरात ‘exclusive license’ नाकारले आणि जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे जय जगदांबा प्रॉडक्शन्सला मानसिक त्रास, प्रतिष्ठात्मक नुकसान आणि व्यावसायिक हानी झाली. सध्या यूट्यूब, फेसबुक, Amazon Prime, Spotify आणि PDL, PPL सारख्या कॉपीराईट संस्थांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू आहे. कॉपीराईट कायदा १९५७ नुसार सुमित म्युझिक कंपनीला नुकसान भरपाई आणि दंडात्मक कारवाई होऊ शकते.
जय जगदांबा प्रॉडक्शन्सची मागणी
हा केवळ करारभंग नाही, तर कॉपीराईट हक्कांवर थेट हल्ला आहे. हक्कांचे नुकसान भरून द्यावे आणि कायद्याचा अपमान करणाऱ्या सुमित म्युझिक कंपनीवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जय जगदांबा प्रॉडक्शन्सने केली आहे.