फोटो सौजन्य - ANI सोशल मीडिया
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : आज सकाळी सात वाजल्यापासून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये बुधवारी सकाळी मतदानाची लाट आल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामधील २८८ जागांसाठी निवडणूक लढवणाऱ्या ४,१४० उमेदवारांना मतदारांनी मतदान केंद्र गाठून मतदानाला सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळपासूनच मुंबईतील बॉलिवूड स्टार्स, भारतीय क्रिकेट खेळाडू त्याचबरोबर अनेक कलाकारांनी मतदानासाठी मोठ्या रांगा लावल्याच्या पाहायला मिळत आहे. आज सकाळी अक्षय कुमारपासून राजकुमार रावपर्यंत सर्व बॉलिवूड स्टार्स मतदान करण्यासाठी आले होते. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल 23 नोव्हेंबर रोजी जाहीर होणार आहेत.
मनोरंजन संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
बुधवारी सकाळीच बॉलिवूडचे कलाकार मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचले. बॉलीवूडचा अभिनेता अक्षय कुमार निळा शर्ट आणि खाकी पँटमध्ये आपल्या कारमधून मतदान केंद्रात दाखल झाला आणि मतदान केले. मतदान केल्यानंतर अक्षय कुमारने मीडियाशी संवाद साधला. माध्यमांशी बोलताना अक्षय कुमार म्हणाला की, ‘चांगली गोष्ट म्हणजे मतदान केंद्रातील व्यवस्था अधिक चांगली आहे. आतून स्वच्छ ठेवले जाते. मी एवढेच म्हणेन की लोकांनी यावे आणि मतदान करावे.
#WATCH | Mumbai: Actor Akshay Kumar shows his inked finger after casting his vote for #MaharashtraAssemblyElections2024
He says “The arrangements here are very good as I can see that arrangements for senior citizens are very good and cleanliness has been maintained. I want… pic.twitter.com/QXpmDuBKJ7
— ANI (@ANI) November 20, 2024
अक्षय कुमारसोबतच बॉलीवूड स्टार राजकुमार रावही सकाळी मतदानासाठी पोहोचले. राजकुमार राव म्हणाले, ‘मतदान हा जनतेचा हक्क आहे. या अधिकारांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मी जनतेला करतो. राजकुमार रावसोबतच बॉलिवूडचे सुपरहिट दिग्दर्शक कबीर खान यांनीही मतदान केले आहे.
Voting spotlight 📽️
Our National Icon, Film Actor, Rajkumar Rao casts his vote today, encouraging voters to step out!🎬 His words are sure to inspire all of us. ✨ @RajkummarRao#MaharashtraElections2024 #AssemblyElections2024 #Elections2024 #ECI#Maharashtra pic.twitter.com/rXPsAU2Rgu
— Election Commission of India (@ECISVEEP) November 20, 2024
बॉलीवूड स्टार्ससह क्रिकेट सुपरस्टार सचिन तेंडुलकरने 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाग घेतला होता. सचिन तेंडुलकर पत्नी अंजली आणि मुलगी सारा तेंडुलकरसह येथील मतदान केंद्रावर पोहोचला. सचिन तेंडुलकरने सर्वप्रथम मीडियासमोर कुटुंबासोबत फोटोसाठी पोज दिली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहेत. आज उमेदवारांचे भवितव्य पेट्यांमध्ये बंद होणार आहे.