(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
‘आई’ हा फक्त एक शब्द नाही, तर ती एक भावना आहे – जी जीवन देते, जगायला शिकवते आणि प्रत्येक श्वासात आपल्या मुलांसाठी जगते. प्रत्येक आईचे प्रेम निस्वार्थ असते, कोणत्याही अटी किंवा अपेक्षांशिवाय. कदाचित म्हणूनच असं म्हणतात, ‘देव सर्वत्र असू शकत नाही, म्हणूनच त्याने आईला बनवले आहे.’ मातृदिना निमित्त प्रत्येकाने त्यांच्या आईची आठवण शेअर केली आहे, पण काही सेलिब्रिटींच्या पोस्ट खरोखरच आमच्या मनाला भिडल्या. अनेक कलाकारांनी त्यांच्या आईसाठी सुंदर न देखील लिहिली आहे.
या खास प्रसंगी सनी देओलने त्याची आई प्रकाश कौरसोबत घालवलेल्या क्षणांना टिपणारा एक भावनिक व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये आई आणि मुलाचे अनेक न पाहिलेले फोटो दिसत आहे. जे त्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘त्या महिलेसाठी जिने मला काहीही न मागता सर्वस्व दिले… तुमचे प्रेम माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. आई, मातृदिनाच्या शुभेच्छा.’ असे लिहून अभिनेत्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
बॉक्स ऑफिसवर ‘Raid 2’ ची मजबूत पकड, ९ व्या दिवसापेक्षा चित्रपटाची १० व्या दिवशी एवढी कमाई!
अनुपम खेर यांनीही अभिनंदन केले
अनुपम खेर यांनी त्यांच्या आई दुलारी खेर यांचा हसरा फोटोही इंस्टाग्रामवर पोस्ट केला. या सुंदर फोटोसह, त्यांनी सर्वांना मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि त्याच्या आईच्या साधेपणाला आणि हास्याला सलाम केला. अभिनेत्यांची पोस्ट पाहून चाहते देखील भावुक झाले आहेत. तसेच त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे.
बोनी कपूर यांची पोस्ट
सोशल मीडियावर भावनिक होऊन त्याने बोनी कपूर यांनी त्यांच्या आईसोबतचा बालपणीचा एक गोंडस फोटो शेअर केला, तसेच अस्थी विसर्जन समारंभातील एक मार्मिक क्षणही शेअर केला. या पोस्टद्वारे त्यांनी अंतिम निरोपाची झलक देखील दाखवली आणि एक हृदयस्पर्शी कॅप्शन लिहिले: ‘आई, तू माझी सर्वात गोड ‘नमस्कार’ आणि सर्वात कठीण ‘निरोप’ होतीस… #MothersDay #happymothersday’, असे लिहून अभिनेत्याने आईची आठवण काढून तिच्यासाठी खास न लिहिली आहे.
नीतू कपूरने शेअर केला आलिया-रणबीरच्या लग्नाचा फोटो
मातृदिनाच्या निमित्ताने, नीतू कपूरने त्यांची सून आलिया भट्ट आणि मुलगी रिद्धिमा कपूरसोबतचा एक फोटो शेअर केला, जो रणबीर-आलियाच्या लग्नातला एक सुंदर फोटो आहे. फोटोसोबत अभिनेत्रीने ‘मातृदिनाच्या शुभेच्छा माझ्या प्रिये.’ असे लिहून त्यांनी हा फोटो शेअर केला आहे.
आमिर खान प्रॉडक्शनने देखील शेअर केला फोटो
अभिनेता आमिर खान यांच्या आमिर खान फिल्म प्रॉडक्शनने देखील त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर सुंदर फोटो शेअर केले आहे. तसेच त्यांनी त्यांच्या प्रेक्षक बनवलेल्या चित्रपटामधील आईसोबतचे क्षण शेअर केलेल्या फोटोमध्ये टिपले आहेत. ज्यामध्ये तारे जमीन पर, दंगल यांसारख्या चित्रपटामधील आईसोबतची झलक दिसत आहे.