(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
हिंदी चित्रपटांचा काळ कोणताही असो, आईवर आधारित कथा प्रत्येक काळात पाहिल्या गेल्या आहेत. या चित्रपटांमधून आईची महानता, प्रेम, त्याग आणि प्रेम अतिशय सुंदरपणे चित्रित केले आहे. आज आपण मातृदिनानिमित्त अशाच काही निवडक चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत. खरं तर प्रत्येक दिवस हा आईचा असतो आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आईमुळे खास असतो. आज मातृदिनानिमित्त आपण आईवर आधारित चित्रपटांवर नजर टाकणार जे चित्रपट पाहून तुम्ही नक्कीच भावुक व्हाल.
मॉम
अभिनेत्री श्रीदेवीचा ‘मॉम’ (२०१७) हा चित्रपट एक क्राइम थ्रिलर चित्रपट होता. एक आई आपल्या मुलीला त्रास देणाऱ्या लोकांवर कशी सूड घेते या कथेभोवती हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटातील श्रीदेवीच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले, तिने आईच्या वेदना आणि सूडाचे पात्र मोठ्या पडद्यावर अतिशय उत्तम प्रकारे सादर केले. हा चित्रपट रवी उदयवार यांनी दिग्दर्शित केला होता. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला.
भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर सलमान खानचे ट्विट; नेटकऱ्यांनी ट्रोल केल्यानंतर भाईजानने केले ‘हे’ कृत्य
मदर इंडिया
मेहबूब खान दिग्दर्शित ‘मदर इंडिया (१९५७)’ चित्रपटाची कथा एका खंबीर स्त्री आणि आईचे जीवन दर्शवते. चित्रपटात राधाची भूमिका साकारणारी नर्गिस दत्त आयुष्यातील प्रत्येक संघर्षाचा सामना करते आणि तिच्या मुलांना वाढवते. चित्रपटाच्या शेवटी, जेव्हा तिचा मुलगा चुकीचा निर्णय घेतो आणि गुन्हा करतो तेव्हा ती त्याला माफ करत नाही आणि त्याला गोळी घालते. या चित्रपटाचि कथा प्रेक्षकांना चकित करणारी आहे.
जज्बा
संजय गुप्ता दिग्दर्शित ‘जज्बा’ (२०१५) या चित्रपटात ऐश्वर्या रायने वकील आणि आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटात, ऐश्वर्या रायचे पात्र तिच्या अपहरण झालेल्या मुलीला वाचवण्यासाठी एका गुन्हेगाराला वाचवते. या प्रवासात तिला कोणत्या प्रकारच्या अडचणी येतात आणि ती आई म्हणून तिचे कर्तव्य कसे पार पाडते, हे सगळं या चित्रपटाच्या कथेत दिसत आहे.
Operation Sindoor नंतर हर्षवर्धन राणेने घेतला मोठा निर्णय; ‘सनम तेरी कसम’च्या सीक्वलबाबत दिले अपडेट!
मिमी
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘मिमी (२०२१)’ चित्रपटात कृती सेननने सरोगेट आईची भूमिका साकारली होती. ती पैशासाठी दुसऱ्याचे मूल पोटात ठेवते आणि त्याचे खरे आई वडील त्या मुलाला अचानक नाकारतात. आणि मग मिमी तिच्या सरोगेट बाळाला वाढवते. या चित्रपटात प्रेक्षकांना आईचे एक वेगळे रूप पाहायला मिळते. या चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला चालला आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला.
कहानी २
विद्या बालनने सुजॉय घोष दिग्दर्शित ‘कहानी २-दुर्गा राणी सिंग’ (2016) या चित्रपटात काम केले. या चित्रपटाची कथा दुर्गा (विद्या बालन) भोवती फिरते जी एका मुलीला आपल्या मुलीसारखे वाढवते आणि तिला तिच्या वाईट नातेवाईकांपासून दूर ठेवते. चित्रपटाचा क्लायमॅक्स इतका जबरदस्त आहे की प्रेक्षक थक्क होतात.
हेलीकॉप्टर ईला
प्रदीप सरकार दिग्दर्शित ‘हेलिकॉप्टर ईला’ (२०१८) या चित्रपटात काजोलने एका आईची भूमिका साकारली होती. ईला (काजोल) चे आयुष्य तिच्या मुलाभोवती फिरते. शेवटी मुलगा त्याच्या आईपासून वेगळा राहण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर ईला तिचे अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तिचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी कॉलेजला जाते. आईला आयुष्यात अशा प्रकारे पुढे जाताना पाहून ईलाचा मुलगाही खूप आनंदी होतो. आणि ही कथा एका चांगल्या मार्गावर वळते.