(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बी.आर. चोप्रा यांचे महाभारत आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. लोकांच्या हृदयात त्याचे एक विशेष स्थान आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्राने लोकांना प्रभावित केले आणि आजही लोक त्यांना याच नावाने ओळखतात. महाभारतात कर्णाची भूमिका पंकज धीर यांनी केली होती. पंकज धीर यांना लोक खूप प्रेम करत होते. सर्वांचे आवडते पंकज धीर यांचे आता निधन झाले आहे. वयाच्या ६८ व्या वर्षी ते कर्करोगाशी झुंज देत जगाचा निरोप घेतला आहे. तसेच त्यांच्या जाण्याने इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
प्रभास फॅन्ससाठी हा महिना ठरणार खास, ‘The RajaSaab’चं इंट्रो गाणं ऑक्टोबरमध्ये लॉन्च
पंकज धीर यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीवर दुःखाची लाट पसरली आहे. चाहते आणि सेलिब्रिटींनाही पंकज आता हयात नाही यावर विश्वास बसत नाही. वृत्तानुसार, पंकज यांना कर्करोगाचे निदान झाले होते आणि त्यांनी ही लढाई जिंकली होती. परंतु, गेल्या काही महिन्यांत त्यांना पुन्हा कर्करोग आजार झाला, ज्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. लोक पंकज धीर यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. पंकज धीर यांनी महाभारतद्वारे प्रेक्षकांच्या मनात अव्वल स्थान निर्माण केली. त्यावेळी अभिनेत्याने किती मानधन घेतले होते हे आपण आता जाणून घेणार आहोत.
पंकज यांना किती होते मानधन?
पंकज धीर हे महाभारतात कर्णाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध झाले. या शोसाठी त्यांना किती पैसे मिळाले हे फार कमी लोकांना माहिती आहे. त्यांना शोसाठी खूप कमी पैसे मिळाले होते. अहवालांनुसार पंकज धीर यांना प्रति एपिसोड फक्त ३,००० रुपये देण्यात आले होते. त्यांनी महाभारताच्या ९४ भागांमध्ये काम केले. तसेच त्यांचे पात्र प्रेक्षकांना खूप आवडले, यानंतर त्यांचे नशीब उजळले. आणि त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले.
दिवाळी सुट्टीत बिंज-वॉचसाठी धमाका! ‘छावा’, ‘सैयारा’ आणि ‘महावतार नरसिंह’ आता ओटीटीवर
पंकज धीर यांनी त्यांच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये काम केले आहे. त्यांनी चंद्रकांता आणि द ग्रेट मराठा यासारख्या अनेक पौराणिक शोमध्येही काम केले आहे. त्यांनी सोल्जर, बादशाह आणि सडक सारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. पंकजच्या अभिनयाने नेहमीच चाहत्यांना प्रभावित केले आहे, ज्यामुळे तो त्यांचा आवडता बनला आहे. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांच्या कुटुंबात पत्नी अनिता धर आणि त्यांचा मुलगा निकितन धीर यांना सोडून गेले आहेत. तसेच मुलगा निकितन धीर हा इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे आणि त्याची पत्नी देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे.