(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग सध्या तिच्या आगामी ‘दे दे प्यार दे २’ चित्रपटामुळे सतत चर्चेत आहे. आज, ‘जागतिक आरोग्य दिन’ असल्यामुळे यानिमित्त, रकुलने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही खास फोटो शेअर केले आहेत. यासोबतच तिने ‘जागतिक आरोग्य दिना’निमित्त एक खास टीप देखील चाहत्यांसाठी लिहिलीआहे आणि चाहत्यांना एक खास प्रश्न विचारला आहे.
रकुलने चाहत्यांना ‘जागतिक आरोग्य दिनाच्या’ दिल्या शुभेच्छा
रकुल प्रीत सिंगने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे अनेक अद्भुत फोटो शेअर केले आहेत. या छायाचित्रांमध्ये रकुल जेवण करताना, योगा करताना आणि गोल्फ खेळताना दिसत आहे. या पोस्टसह, रकुलने तिच्या चाहत्यांना ‘जागतिक आरोग्य दिनाच्या’ शुभेच्छा दिल्या आणि ती स्वतःला कसे आनंदी ठेवते हे सांगितले आहे.
Jackie Chan Bday: नाईलाजाने अडल्ट चित्रपटात केले काम, सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर केली मजुरी; आता हाँगकाँगवर करतोय राज्य!
रकुलची इंस्टाग्राम पोस्ट
रकुलने पोस्ट शेअर करताना लिहिले की, “आज जागतिक आरोग्य दिन आहे आणि येथे काही सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात समाविष्ट करू शकता,” रकुलने इंस्टाग्रामवर या आश्चर्यकारक फोटोंना कॅप्शन दिले. रकुल पुढे लिहिते, “पौष्टिक आणि जागरूक अन्नाने तुमची ऊर्जा वाढवा.” पुस्तके वाचा आणि तुमचे मन मोठे करा, आणि शांत ठेवा.” असं लिहून अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे.
तुम्ही स्वतःला कसे आनंदी ठेवू शकता यांचा दिला सल्ला
रकुलने या पोस्टवर पुढे लिहिले, “जेव्हा तुम्ही निसर्गाशी जोडले जाता तेव्हा ती एक अशी भावना असते जी समजावून सांगता येत नाही. तुमच्या आवडीचा कोणताही खेळ निवडा… माझा गोल्फ आहे. स्वतःला शांत करण्यासाठी आणि मन, शरीर, आत्म्याचे संतुलन साधण्यासाठी ध्यान करा.. हे सगळं केल्याने दिवसातून फक्त ५ मिनिटे खूप मोठा बदल घडवून आणतील. जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा मूर्खासारखे हसा कारण आनंद हे तुमच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम औषध आहे.” असं अभिनेत्री म्हणाली आहे.
कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयाचा ठोठावला दरवाजा, काय आहे नेमकं कारण?
रकुलने चाहत्यांना विचारला एक खास प्रश्न
रकुलने पुढे लिहिले, “तुम्ही छोट्या पावलांनी सुरुवात करा आणि मला सांगा की तुम्ही आधीच कोणत्या गोष्टी करत आहात आणि तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडवू इच्छिता. लक्षात ठेवा की तुम्ही खरोखर फक्त एकाच ठिकाणी राहता – तुमचे शरीर.” असं तिने लिहिले आहे.