(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचा पाकिस्तानबद्दलचा दृष्टिकोन कडक झाला आहे. सर्व पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत भारत सोडून त्यांच्या मायदेशी पाकिस्तानात जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दुसरीकडे, सिंधू नदी पाणी करार देखील थांबवण्यात आला आहे. बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आली आहे. फवाद खानचा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही आणि ‘अबीर गुलाल’ मधील गाणीही यूट्यूबवरून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याच वेळी, लोक हानिया आमिरवरही आपला राग काढत आहेत.
२ ब्लॉकबस्टर मुव्हीला दिला होता कंगनाने नकार, बॉलिवूडचा भाईजान भडकून म्हणाला, ‘मी तुला…’
हानिया आमिरला क्षेपणास्त्र चाचणीची चिंता
पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सतत दुःख व्यक्त करत आहे. असे असूनही, तिला भारत किंवा पाकिस्तानकडून पाठिंबा मिळत नाही. दरम्यान, हानिया आमिरला आता भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्याची चिंता आहे. खरंतर, काल भारतात एका क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. आता हानिया आमिरला याची काळजी वाटते आहे. त्याची चिंता ती सोशल मीडियावर व्यक्त करताना दिसली आहे.
Going to sleep. Hope not wake-up by Indian missiles tomorrow
— Hania Aamir (@HaniaAamir__) April 24, 2025
क्षेपणास्त्राला घाबरलेल्या हानियाने पाकिस्तानला काय संदेश दिला?
हानिया आमिरने तिच्या एक्स हँडलवरून ट्विट केले आणि लिहिले की, ‘मी झोपायला जात आहे. आशा आहे की, उद्या भारतीय मिसाईल जागले जाणार नाहीत.’ आता, हानियाच्या या ट्विटवरून हे स्पष्ट होते की क्षेपणास्त्र चाचणीमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीतीनंतर, हानिया आमिरने पाकिस्तानी लोकांना एक खास संदेशही दिला आहे. अभिनेत्रीने पाकिस्तानला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आणि ट्विट केले, ‘प्रिय पाकिस्तान, आज रात्री झोपू नका!’, असं अभिनेत्रीने लिहिले आहे.
चित्रपट वादादरम्यान ‘फुले’ प्रदर्शित; प्रतीक गांधीने व्यक्त केली चिंता, म्हणाला “देश बदलला आहे…”
पाकिस्तानच्या मौनाचा फटका मुलांना सहन करावा लागेल!
हानिया आमिरने पुन्हा एकदा पाकिस्तानला मौन सोडण्यास सांगितले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर पाकिस्तानी अभिनेत्रीने लिहिले की, ‘तुमचे आजचे मौन उद्या तुमच्या मुलांना त्रास देईल. आता काहीतरी करा, नाहीतर त्यांना त्रास होईल.’ या हल्ल्यानंतर हानिया आमिर खूप दुःखी आहे आणि ती मनापासून भारताला पाठिंबा देत आहे. याआधी तिने आणखी एक पोस्ट शेअर केली होती आणि म्हटले होते की, ‘मी राग आणि दुःखाने भरलेली आहे.’ हे लिहिताना तिने ‘सर्वांच्या नजरा पहलगामवर’ ही पोस्ट शेअर केली.