Kangana Ranaut Rejected Salman Khan Blockbuster Movies Offer Sultan Bajrangi Bhaijaan
बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खान कायमच आपल्या स्टाईलमुळे चर्चेत राहिला आहे. त्याच्या स्टाईलची, लूकची आणि अभिनयाची कायमच जोरदार चर्चा होते. सलमान खानसोबत काम करण्यासाठी कायमच प्रत्येक सेलिब्रिटी कायमच आतुर असतो. टॉलिवूड, बॉलिवूडसह आणि इतर सेलिब्रिटी त्याच्यासोबत काम करण्यासाठी आतुर असतात. पण बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांनी सलमानसोबत काम करण्याची ऑफर थेट धुडकावून लावली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रणौत आहे.
चित्रपट वादादरम्यान ‘फुले’ प्रदर्शित; प्रतीक गांधीने व्यक्त केली चिंता, म्हणाला “देश बदलला आहे…”
कंगना राणौत कायमच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. काही काळापूर्वी अभिनेत्रीने सांगितले होते की, तिने भाईजानचे चित्रपट करण्यास नकार दिला होता. तिने मुलाखतीत त्यामागील कारणही सांगितले होते. यासोबतच, सलमान खानने यावर तिला काय म्हटले तेही तिने सांगितले. कंगना राणौतने गेल्या वर्षी २०२४ मध्ये सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला होता. कंगनाने मुलाखतीत सांगितले की, “सलमान खानने मला ‘बजरंगी भाईजान’मध्ये भूमिका ऑफर केली होती. ती भूमिका करण्यासाठी मी नकार दिला होती. त्याने मला कोणत्या प्रकारची भूमिका देण्यात आली आहे, याचा मला प्रश्न पडला होता. त्यानंतर मला ‘सुलतान’साठी संपर्क करण्यात आला होता. पण मी ती सुद्धा ऑफर नाकारली होती.”
“मी मुस्लीम असून सर्व हिंदूंची …”; प्रसिद्ध काश्मीरी बॉलिवूड अभिनेत्रीचा फुटला बांध
सतत सलमानच्या दोन चित्रपटांची ऑफर नाकारल्यामुळे सलमान खान तिला काही अंशी रागाच्या भरात म्हणाला होता की, “आता मी तुला आणखी कोणत्या प्रकारचा चित्रपट ऑफर करु शकतो.” कंगना राणौतची ही जुनी मुलाखत पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. कंगनाने एका मुलाखतीत सलमान खानचे तोंड भरुन कौतुक केले होते. ती म्हणाली होती की, “सलमान एक दयाळू व्यक्ती आहे. ‘इमर्जन्सी’च्या शुटिंग दरम्यान तो सलमान नेहमीच मला प्रोत्साहन द्यायचा. तो त्यावेळी माझ्यासोबत नेहमीच बोलायचा. तो ‘इमर्जन्सी’ चित्रपट पाहण्यासाठी फार उत्सुक असल्याचा मला बोलला होता. आमचा एक कॉमन मित्र आहे. त्याने सलमानला माझा चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला होता. तो सलमानला म्हणाला की, ‘तू जाऊन बघ कंगनाने कोणत्या पद्धतीचा चित्रपट बनवला आहे.’ माझा चित्रपट पाहिल्यानंतर भाईजानने मला फोन केला होता. भाईजान मला फोनवर म्हणाला की, ‘तुझा खूप चांगला चित्रपट आहे.’ मी त्याला म्हणाले की, ‘तुझ्याकडे माझ्या चित्रपटाविषयी फक्त माहिती आहे. तू अजूनही माझा चित्रपट पाहिलेला नाही.’ अशा प्रकारचे बाँडिंग आमच्यात आहेत.”
कंगनाच्या कामाबद्दल बोलायचे तर, कंगना शेवटची ‘इमर्जन्सी’ चित्रपटात पडद्यावर दिसली होती. या चित्रपटामध्ये अभिनेत्रीने अभिनय केला असून तिने चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटातील कंगनाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. तथापि, हा चित्रपट फारसा बॉक्स ऑफिसवर चमत्कार करू शकला नाही.