(फोटो सौजन्य - x अकाउंट)
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आहे. मध्यरात्री भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले. त्याला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले. या कारवाईबद्दल बॉलिवूड आणि टीव्ही कलाकार भारतीय लष्कराचे कौतुक करत असताना, पाकिस्तानी कलाकारांनी या कारवाईचा निषेध केला आहे. हानिया आमिरपासून ते माहिरा खानपर्यंत, पाकिस्तानी अभिनेत्रींनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी भारताने घेतलेल्या प्रत्युत्तराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. दोन्ही अभिनेत्री याबद्दल काय म्हणाल्या जाणून घेऊयात.
हानिया आमिरने भ्याडपणाचे वर्णन केले
भारताने केलेल्या हवाई हल्ल्यावर पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर फातिमा भुट्टो यांचे ट्विट शेअर केले आणि ते ‘भ्याड कृत्य’ म्हटले. जरी हानिया आमिरचे इंस्टाग्राम अकाउंट भारतात बंदी घातलेले असले तरी तिची पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल होत आहे. पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्यात तिने लिहिले की , “माझ्याकडे सध्या कोणतेही चांगले शब्द नाहीत. माझ्याकडे फक्त राग, वेदना आणि दुखावलेलं हृदय आहे. एक मूल गेलं, कुटुंब विखुरली गेली आणि हे सर्व कशासाठी? अशा प्रकारे तुम्ही कोणाचंही रक्षण करत नाही. ही निव्वळ क्रूरता आहे. तुम्ही निष्पाप लोकांवर बॉम्ब टाकून त्याला रणनिती म्हणू शकत नाही. ही ताकद नाही, हा भ्याडपणा आहे. आम्ही तुम्हाला पाहत आहोत.”
आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेला हिंदी चित्रपट “चिडिया” आता लवकरच झळकणार सिनेमागृहात!
पाकिस्तानमधील प्रसिद्ध अभिनेत्री माहिरा खानने लेखिका फातिमा भुट्टे यांच्या ट्विटला रिपोस्ट करत भारताच्या हवाई हल्ल्याची निंदा केली. “खरंच हा भ्याड हल्ला आहे. अल्लाह आमच्या देशाची रक्षा करो”, असं तिने लिहिलं आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने हानिया आणि माहिरासह अनेक पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट्स भारतात बंद केले आहेत.
फातिमा भुट्टो यांचे ट्विट काय आहे?
भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी लेखिका फातिमा भुट्टो यांनी एक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की या ऑपरेशन दरम्यान एक मूल गंभीर जखमी झाले आहे. ट्विटरवर हा अहवाल शेअर करताना त्यांनी लिहिले की, ‘एक मूल भारताच्या आक्रमकतेचा बळी ठरले आहे. लोक झोपेत असताना कोणत्या प्रकारचे राज्य अनेक सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट करते?’
ऑपरेशन सिंदूरचा निषेध करताना, लेखिका फातिमा भुट्टो यांनी लिहिले की, “इस्रायलने आंतरराष्ट्रीय कायदा आणि राजनैतिक मुत्सद्देगिरीकडे उघड दुर्लक्ष केल्यामुळे पाकिस्तान किती विस्कळीत झाला आहे याचे संकेत भारताने पाकिस्तानवर केलेल्या अनेक हल्ल्यांवरून मिळतात.” आजपर्यंत त्याने त्याचे निराधार दावे सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा दिलेला नाही. यामुळे तो एक वाईट अभिनेता बनला आहे.”
शंकर महाराज यांची जीवन पटकथा आता रूपेरी पडद्यावर, “अवलिया” चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच!
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन आठवड्यांनंतर भारतीय सशस्त्र दलांनी मंगळवारी रात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (पीओके) नऊ दहशतवादी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. ज्यात लष्कर-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा बालेकिल्ला असलेल्या बहावलपूरचाही समावेश आहे. भारताने असंही स्पष्ट केलंय की कोणत्याही पाकिस्तानी लष्करी आस्थापनेला लक्ष्य केलेलं नाही. भारताने लक्ष्यांची निवड आणि त्यांची अंमलबजावणी करण्याच्या पद्धतीमध्ये खूप संयम दाखवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चे बारकाईने निरीक्षण केले आहे.