(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बीआर चोप्रांच्या रामायण या मालिकेत कर्णाची भूमिका करणारे अभिनेते पंकज धीर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. अभिनेता राजा मुराद यांनी त्यांच्या निधनाची घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की पंकज यांच्या शरीराच्या अनेक भागात कर्करोग पसरला असल्याने त्यांच्यावर अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. तसेच त्यांच्या या उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पंकज यांच्या निधनाने त्यांचे कुटुंब खूप दुःखी आणि शोक व्यक्त करत आहेत. पंकज यांचा मुलगा आणि सूनही या क्षेत्रात सक्रिय आहेत. तसेच त्यांचा मुलगा हा लोकप्रिय अभिनेता आहे. पंकज धीर यांच्या पत्नीचे नाव अनिता धीर आहे, त्या एक कॉस्च्युम डिझायनर आहे. तसेच, पंकज यांच्या भावाचे नाव सतलज धीर आहे, तो एक चित्रपट निर्माती आहे, जी इक्के पे इक्का आणि मेरा सुहाग सारख्या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे.
पंकज धीर यांचा मुलगा आणि सून लोकप्रिय अभिनेते
पंकज धीर यांच्या मुलाचे नाव निकितिन धीर आहे, जो एक लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता आहे. त्यांनी जोधा अकबर या चित्रपटातून पदार्पण केले. निकितिन चेन्नई एक्सप्रेसमधील थंगाबली या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. त्यांचे आजवर अनेक चित्रपटामध्ये काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. निकितिन मिशन इस्तंबूल, रेड्डी, दबंग 2, कांचे, हाऊसफुल 3, फ्रीकी अली, मिस्टर शेरशाह, सूर्यवंशी, अंतीम: द फायनल ट्रुथ, खिलाडी, सर्कस आणि हाऊसफुल 5 यांसारख्या चित्रपटांमध्ये खास भूमिकेत दिसला. तो शेवटचा पंजाबी चित्रपट अकाल: द अनकॉन्क्वर्डमध्ये दिसला आहे.
पंकज धीर यांची सून, कृतिका सेंगरचे प्रसिद्ध शो
पंकज यांच्या सुनेबद्दल बोलायचे झाले तर तिचे नाव कृतिका सेंगर आहे. कृतिका सेंगरने टीव्ही जगतात प्रसिद्धी मिळवलेली अभिनेत्री आहे. पुनर विवाह या शोद्वारे तिला ओळख मिळाली, ज्यामध्ये तिने गुरमीत चौधरी सोबत भूमिका केली होती. कृतिकाने तिच्या करिअरची सुरुवात क्यूंकी सास भी कभी बहू थी या शोमधून केली होती. कसौटी जिंदगी की, क्या दिल में है, कौन जीतेगा बॉलिवूड का टिकट, एक वीर स्त्री की कहानी – झांसी की रानी, आहत, देवों के देव महादेव, सर्विस वाली बहू, कसम तेरे प्यार की, आणि छोटी सरदारनी यांसारख्या शोमध्ये ती दिसली आहे.