(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
प्रकाश, आनंद आणि आठवणींनी भरलेला सण म्हणजे ‘दिवाळी’. या निमित्ताने सगळीकडे उजळून निघालेलं वातावरण, फराळाच्या चविष्ट पंगती, आणि कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांमधील गोडवा यामुळे दिवाळी खास ठरते. छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये प्रत्येकाची एक खास आठवण असते आणि कलाकारही त्याला अपवाद नाहीत. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ मधील स्वानंदी ही भूमिका साकारणारी तेजश्री प्रधान हिने दिवाळीबद्दल तिच्या भावना उलगडून सांगितल्या .
दिवाळीतील फटाके आणि फराळाच्या संदर्भात बोलताना तेजश्री म्हणाली, “मला वाटतं मी फुलबाजीसारखी आहे. ती ‘तड तड’ आवाज करत प्रकाश देते, पण त्याच वेळी शांततेची अनुभूतीही देते. ती हळूहळू मंद होत जाते . फराळाच्या पदार्थांबाबत विचारल्यावर तेजश्रीने म्हणते “माझ्या मते, मी चिवड्यासारखी आहे. बाकीच्या फराळाच्या पदार्थांपेक्षा तो थोडा हेल्दी असतो आणि त्यात बऱ्याच गोष्टींचं मिश्रण असतं. त्याप्रमाणे मी ही अनेक विषयांवर बोलते आणि लोकांच्या मनाला आधार देते.” तिच्या या विचारांतून तिच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलू स्पष्टपणे दिसून येतात. आपल्या दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी प्रत्येक दिवाळी कुटुंब आणि मित्रांमध्ये साजरी केली आहे, आणि यंदाही त्यांच्याबरोबरच दिवाळी घालवणार आहे. दिवाळीत एक खास परंपरा आवर्जून जपते ती म्हणजे घरासमोर खूप सारे दिवे लावणं आणि सर्वत्र प्रकाश व आनंद पसरवणं.”
झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ मधील स्वानंदी ही संवेदनशील आणि ताकदवान भूमिका साकारणाऱ्या तेजश्री प्रधान हिने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. तिच्या नैसर्गिक अभिनयशैलीमुळे आणि प्रभावी संवादफेकीमुळे स्वानंदी ही भूमिका घराघरात पोहोचली.दिवाळीच्या निमित्ताने तेजश्रीने तिच्या आयुष्यातील खास आठवणी, विचार आणि सण साजरा करण्याच्या पद्धती शेअर करत, चाहत्यांच्या मनात आणखी जवळीक निर्माण केली आहे.
“आता वेळ आली आहे…” कतरिना कैफच्या प्रेग्नंसीबद्दल विकी कौशल उत्साहित, जोडपं लवकरच देणार गुडन्यूज
झी मराठी वाहिनीवर ‘वीण दोघातली ही तुटेना’ही कौटुंबिक आणि भावनात्मक मालिका अलीकडेच सुरू झाली आहे. या मालिकेतील प्रमुख भूमिका तेजश्री प्रधान (स्वानंदी) आणि सुबोध भावे (समर) साकारत आहेत. ‘होणार सून मी ह्या घरची’ आणि ‘लोकमान्य’ सारख्या प्रोजेक्ट्सनंतर पुन्हा एकदा या दोघांची जोडी छोट्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.