(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
पायल गेमिंगचा व्हिडिओ व्हायरल
अलीकडेच, पायल गेमिंगचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. तसेच, पायलचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती दुबईतील एका कार्यक्रमात सहभागी होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक मिस्ट्री मॅन देखील दिसत आहे, ज्याला पायल तिचा दहावा नवरा असल्याचा दावा करते आहे. खरंतर, हा व्हिडिओ १ वर्ष जुना आहे आणि पायलने तो तिच्या अकाउंटवर शेअर केला नव्हता पण त्या मिस्ट्री मॅनने तो त्याच्या यूट्यूब चॅनेलवर शेअर केला होता.
हा मिस्ट्री मॅन नक्की कोण?
व्हायरल व्हिडिओमध्ये पायलसोबत दिसणाऱ्या मिस्ट्री मॅनचे नाव अभिनव रेड्डी आहे, जो एक प्रसिद्ध ट्रॅव्हल युट्यूबर आहे. अभिनव त्याचे व्लॉग तयार करण्यासाठी वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास करतो. त्याने त्याच्या युट्यूब चॅनल, अभिनव ट्रॅव्हल्सवर दुबईतील एका कार्यक्रमाचा व्लॉग देखील शेअर केला. या व्हिडिओमध्ये, अभिनव दुबई शेखच्या वेशात आहे आणि मस्करीत पायलला म्हणतो की ती त्याची पाचवी पत्नी आहे. पायल विनोदाने उत्तर देते, “आणि हा माझा दहावा नवरा आहे.”
पायल गेमिंग आहे तरी कोण?
पायल ही छत्तीसगडमधील भिलाई येथील एक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. पायलने तिच्या कारकिर्दीची सुरुवात गेमिंग व्हिडिओंपासून केली आणि अखेर ती एक टॉप सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनली आहे. पायलचे इन्स्टाग्रामवर ४.२ दशलक्ष फॉलोअर्स आणि युट्यूबवर ४.५ दशलक्षाहून अधिक सबस्क्राइबर आहेत. तिच्या व्हिडिओंना सोशल मीडियावर लाखो व्ह्यूज मिळतात. तसेच त्याचा चाहते वर्ग देखील जास्त आहे.






