(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दिग्दर्शक हेमंत ढोमे आणि निर्माती क्षिती जोग यांच्या क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. आता मराठी शाळा पुन्हा भरणार, 1 जानेवारी पासून प्रवेश सुरू होणार क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ असं कॅप्शन देतं या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला आहे. ट्रेलरच्या सुरूवातीला हे माजी विद्यार्थी त्यांच्या जुन्या शाळेच्या वर्गात जमल्याचे दिसत आहे. अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कांदबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, प्राजक्ता कोळी या कलाकारांनी क्रांतिज्योती विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची भूमिका साकारली आहे.प्रत्येक जण वेगळा असतो—स्वभाव वेगळा, राहणीमान वेगळं. पण तरीही त्यांच्यात एक खास मैत्री आहे. जेव्हा ते सगळे एकत्र येतात, तेव्हा शाळेच्या जुन्या आठवणी आठवून आनंद घेतात.
त्यांचे मुख्याध्यापक (सचिन खेडेकर) सांगतात की त्यांची शाळा पाडून तिथे इंटरनॅशनल स्कूल बांधण्यात येणार आहे. ते म्हणतात की गेल्या पाच वर्षांत 1000 पेक्षा जास्त शाळा बंद झाल्या आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे आपणच आपल्या मराठी भाषेला कमी महत्त्व देतो. ते असंही म्हणतात की कदाचित आपणच या पृथ्वीवरची अशी पहिली जमात आहोत, जिला स्वतःच्या आईभाषेचीच लाज वाटते.
मराठी शाळांची घटती संख्या, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व आणि मराठी भाषेबद्दलचा गर्व या विषयांचा मनोरंजक तरीही हृदयस्पर्शी पद्धतीने घेतलेला वेध म्हणजे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’. या चित्रपटात मराठी कलाकारांची दमदार फळी झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर या सर्वांसोबत अभिनेत्री प्राजक्ता कोळी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात पदार्पण करत आहे. या सगळ्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
वडील Dharmendra यांच्या निधनानंतर भाऊ-बहिण एकत्र आले? Border 2 चा टीझर पाहून ईशा देओल काय म्हणाली?
क्षिती जोग यांच्या चलचित्र मंडळी निर्मित ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ येत्या १ जानेवारी २०२६ पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची तगडी स्टारकास्ट पाहता प्रेक्षक या चित्रपटासाठी उत्सुक आहेत. तसेच या चित्रपटाची कथा काय असेल हे जाणून घेण्यासाठी ते आतुर आहेत. प्राजक्ता कोळी या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.






