अनंत अंबानी हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांचे धाकटे पुत्र आहेत. अंबानी कुटुंबातील वंशज एन्कोर हेल्थकेअरचे सीईओ वीरेन मर्चंट यांची मुलगी राधिका मर्चंटसोबत १२ जुलै रोजी मुंबईत लग्न करणार आहेत. अंबानी कुटुंबाने याआधीच दोन प्री-वेडिंग इव्हेंट्सचे आयोजन केले आहे, दोन्ही अनेक दिवसांचे उत्सव साजरा करण्यात आले होते.
अनंत-राधिकाच्या लग्नाचा गाजावाजा आता सर्वत्र सुरु आहे. हे दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. या दोघांच्या प्रत्येक सोहळ्यात मोठे कलाकार सहभागी होताना दिसले आहेत. परंतु अभिनेत्री पप्रियांका चोप्रा कुठेच नजर आली नव्हती. आता ती या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी परदेशातून भारतात पोहचली आहे. त्याचे काही विमानतळावरील फोटोज समोर येत आहेत.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नसोहळ्याच्या एक दिवस आधी 11 जुलै रोजी भारतात आले आहेत. हे जोडपे त्यांची मुलगी मालती मेरी चोप्रा जोनाससह मुंबईतील एका खासगी विमानतळावर पोहोचताना दिसले आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्राचे अंबानी कुटुंबाशी खूप जवळचे नाते आहे. आणि पूर्वी तिच्या आईने आश्वासन दिले होते की ती हा लग्नसोहळा चुकवणार नाही ती नक्की या सोहळ्यात सहभागी होईल असे त्यांनी सांगितले.
तसेच याआधी अनंत-राधिकाच्या लग्नाआधीच्या कार्यक्रम साजरा करण्यात आला होता ज्यामध्ये संगीत कार्यक्रम आणि मेहंदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच आता अनंत-राधिकाच्या लग्नाचा गाजावाजा आता सर्वत्र सुरु आहे. हे दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. ज्यामध्ये खूप मोठे कलाकार आणि उधोगपती सहभागी होताना दिसणार आहेत. तसेच या सोहळ्यात प्रियांका चोप्रा आणि निक जोनास देखील झळकणार आहेत.