(फोटो सौजन्य - x अकाउंट)
जर तुम्हीही ‘स्क्विड गेम’ या मालिकेचे चाहते असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आनंदाची ठरणार आहे. नेटफ्लिक्सने अखेर ‘स्क्विड गेम सीझन ३’ बद्दल एक मोठा खुलासा केला आहे. यावेळी प्रेक्षकांना जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही, कारण सीझन ३ चा धमाकेदार टीझर ६ मे रोजी प्रदर्शित होणार आहे आणि संपूर्ण मालिका २७ जूनपासून स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.
नेटफ्लिक्स कोरियाने अलीकडेच एक खास व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये लोकप्रिय स्क्विड गेम मधील कलाकार ली जंग-जे, वाई हा-जून, पार्क सुंग-हून आणि यिम सी-वॉन – एक कार्ड देत आहेत ज्याचा शेवट एका धक्कादायक खुलाशाने होतो. त्या कार्डवर लिहिले आहे की, ‘टीझर ६ मे रोजी येत आहे, म्हणजेच टीझर मंगळवारीच प्रदर्शित होणार आहे.’ या बातमीने आता प्रेक्षकांना चांगलाच आनंद झाला आहे.
‘Indian Idol 12’ विजेता पवनदीप राजनचा भीषण अपघात; कशी आहे गायकाची तब्येत? जाणून घ्या अपडेट!
तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा अखेर संपली
स्क्विड गेम सीझन २ साठी चाहत्यांना ३ वर्षे वाट पहावी लागली, तर नेटफ्लिक्सने सीझन ३ साठी चाहत्यांना जास्त वेळ वाट पाहत ठेवले नाही. नवीन सीझन फक्त ६ महिन्यांत चाहत्यांसाठी उपलब्ध होणार आहे. गेल्या सीझनच्या धमाकेदार शेवटामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आणि आता सीझन ३ ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
참가자 여러분, 바로 내일 <오징어 게임> 시즌3의 티저 예고편이 공개됩니다. 오직 넷플릭스에서.
* 눌러서 크게 보기 * pic.twitter.com/KgNtwfgsgC
— Netflix Korea|넷플릭스 코리아 (@NetflixKR) May 4, 2025
कथेत नवीन ट्विस्ट काय असेल?
सीझन २ मधील कथेने चाहत्यांना चांगलाच धक्का दिला आहे. तसेच आता सीझन ३ मध्ये नवे काय पाहायला मिळणार कथा कोणत्या दिशेने जाणार हे जाणून घेण्यासाठी सर्व चाहत्यांना उत्सुकता आहे. Squid Game 3 येत्या २७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, पण त्याआधी ६ मे रोजी टीझर पाहून काही संकेत नक्कीच प्रेक्षकांना मिळणार आहेत.
नेटफ्लिक्स टुडम इव्हेंटमध्ये ट्रेलर होईल प्रदर्शित
मे महिन्याच्या अखेरीस नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध टुडम कार्यक्रमात स्क्विड गेम ३ चा संपूर्ण ट्रेलर देखील रिलीज केला जाईल असे वृत्त आहे. याचा अर्थ मे महिना पूर्णपणे स्क्विड गेमसाठी समर्पित असणार आहे.
चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह
या घोषणेमुळे सोशल मीडियावरील चाहते खूप उत्साहित आहेत. #SquidGame3 ट्विटर, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर ट्रेंड करत आहे. काही चाहते म्हणतात की ‘हा सीझन पूर्वीपेक्षा जास्त धक्कादायक आणि भावनिक असेल.’ त्याच वेळी, काही वापरकर्त्यांना आशा आहे की यावेळीही कथेत एक ट्विस्ट देखील दिसेल, जो या मालिकेमधील गेम चेंजर ठरेल. तर तयार व्हा, ६ मे रोजी येणार्या ‘स्क्विड गेम सीझन ३’ च्या टीझरसह एक नवीन प्रवास सुरू होणार आहे. आणि चाहत्यांना नवी कथा आणि मनोरंजनक वेब सिरीज पाहायला मिळणार आहे.