(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलिवूड इंडस्ट्रीची ड्रामा क्वीन राखी सावंत गेल्या अनेक वर्षांपासून दुबईत राहत आहे. तब्बल तीन वर्षांनंतर ती मुंबईत परतली असून गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर चर्चेत आहे.अलीकडेच तिचं नवं म्युझिक व्हिडिओ रिलीज झाला आहे, ज्यात तिच्यासोबत अभिनेता शहबाज खान दिसतो आहे. एका बाजूला राखी या गाण्यामुळे चर्चेत आली असताना, दुसऱ्या बाजूला ती आता तिच्या आयुष्यातील वेदनादायक सत्यामुळे चर्चेत आली आहे.अभिनेत्रीने अलीकडेच आपल्या प्रेग्नंसीबाबत अनेक खुलासे केले आहेत. राखी सावंतनं एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील एका वेदनादायक प्रसंगाबद्दल बोलली. तीने सांगितलं की, ”ती कधीही प्रेग्नंट होऊ शकत नाही, आणि जर असं झालं तर ती मरेल.”
आपल्या कठीण काळाबद्दल बोलताना राखी म्हणाली, “डॉक्टरांनी सांगितलं की जर मी आई झाले तर माझ्या जीवाला धोका होऊ शकतो. एके दिवशी मी कोर्टात जाण्याची तयारी करत होते आणि अचानक बेशुद्ध पडले. मला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तिथे माझं ऑपरेशन झालं.”
राखीनं हेही सांगितलं की डॉक्टरांनी तिला स्पष्ट सांगितलं होतं, ”जर तू आई झालीस, तर तूझ्या जीवाला धोका आहे.”
राखी सावंतनं पुढे सांगितलं की या गोष्टीनं तिला मानसिकदृष्ट्या खूप त्रास झाला, पण तरीही तिनं आशा सोडलेली नाही. राखी म्हणाली,
“डॉक्टरांनी सांगितलं की आता मी आई होऊ शकत नाही, पण मला विश्वास आहे की देवाने ठरवलं तर काहीही शक्य आहे. मी बाळ दत्तक घेणं किंवा सरोगसीचा मार्ग निवडू शकते.”






