(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दक्षिण भारतीय पॉवर कपल राम चरण आणि उपासना कोनिडेला लवकरच दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. या जोडप्याने त्यांच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. राम चरण आणि उपासना दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. उपासनाने सोशल मीडियावर चाहत्यांना बेबी शॉवरची झलक दाखवली, ज्यामध्ये उपासना आणि राम चरण खूप आनंदी दिसत आहेत.
उपासना कोनिडेलाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. तिने बेबी शॉवरचा व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन विधी करत असल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर राम चरण आणि उपासनाचे चाहते खूप आनंदी झाले आहेत.
राम चरण आणि उपासना दुसऱ्यांदा होणार आई- वडील
उपासनाने बेबी शॉवरचा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “ही दिवाळी दुहेरी उत्सव, दुहेरी प्रेम आणि दुहेरी आशीर्वादांबद्दल होती.” व्हिडिओमध्ये उपासना निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. तर राम चरणने कुर्ता- पायजामा घातला आहे. दोघेही संपूर्ण व्हिडीओमध्ये खूप आनंदी दिसत आहे. दोघांना आता चाहते शुभेच्छा देत आहेत.
चाहत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव
उपासनाच्या पोस्टवर चाहते कमेंट करत आहेत आणि या जोडप्याचे अभिनंदन करत आहेत. एका चाहत्याने लिहिले, “खूप खूप अभिनंदन.” दुसऱ्याने लिहिले, “तुमच्या दुसऱ्या प्रेग्नंसीसाठी शुभेच्छा.” दुसऱ्याने लिहिले, “देव तुम्हाला आशीर्वाद देवो, उपासना.” असे लिहून अनेक चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. आणि त्यांना शुभेच्छा देत आहेत.
दुसऱ्यांदा बाबा होणार राम चरण
राम चरण आणि उपासना दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. दोन वर्षांपूर्वी, या जोडप्याने २०२३ मध्ये गोंडस मुलाला जन्म दिला जिचे नाव क्लीन कारा ठेवण्यात आले. २०१२ मध्ये या दोघांनी एकमेकांशी लग्न केले. लग्नाच्या १३ वर्षांनंतर, राम चरण आणि उपासना दुसऱ्यांदा पालक होणार आहेत. कामाच्या बाबतीत, राम चरण लवकरच पेड्डी चित्रपटात दिसणार आहेत. चाहते नेहमीच राम चरणच्या चित्रपटांची वाट पाहत असतात. आणि आता अभिनेता हा नवा कोरा चित्रपट घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार आहे.