(फोटो सौजय -इन्स्टाग्राम)
‘सैयारा’ चित्रपटाची क्रेझ खूप वाढत आहे. ‘सैयारा’च्या चाहत्यांचे असे व्हिडिओ थिएटरमधून येत आहेत, जे या वर्षी यापेक्षा चांगला चित्रपट प्रदर्शित झाला नाही आणि प्रदर्शित होऊ शकत नाही हे सिद्ध करत आहेत. या चित्रपटाने 6 दिवसांत 153 कोटी रुपये कमाई केली आहे. दुसरीकडे, या चित्रपटाचे शीर्षक गीत नवीन विक्रम करत आहे. चित्रपटाची कथा असो, स्टारकास्ट असो किंवा संगीत असो, सर्व काही सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. दरम्यान, आता आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींची यादी समोर आली आहे.
रणबीर कपूरच्या ‘Ramayana’ चित्रपटात ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याची एन्ट्री, खास भूमिकेत झळकणार अभिनेता!
आयएमडीबीने लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींची नावे केली जाहीर
आयएमडीबीने लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींची नावे जाहीर केली आहेत आणि यामध्येही ‘सैयारा’चे वर्चस्व दिसून आले आहे. अहान पांडे आणि अनित पड्डा आता लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अव्वल स्थानावर आहेत. या दोघांनीही आता लोकप्रियतेच्या बाबतीत बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या दिग्गज कलाकारांना मागे टाकले आहे. फक्त एका चित्रपटाने ‘सैयारा’चे अभिनेते अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी इंडस्ट्रीवर राज्य करायला सुरुवात केली आहे. यासोबतच या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहित सुरी यांचाही या यादीत समावेश झाला आहे. मोहित सुरीची रँकिंग जाणून तुम्हालाही धक्का बसेल. दिग्दर्शक देखील या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.
New week, new rankings! ✨ IMDb’s Popular Indian Celebrities list is out now, featuring the stars that fans can’t stop talking about! 💫
See who’s trending in India this week! Download the IMDb app on iOS and Android to check out the full list. 🍿 pic.twitter.com/bsYaRRPp39 — IMDb India (@IMDb_in) July 24, 2025
अहान पांडे आणि अनिता पड्डा मिळवले वर्चस्व
आयएमडीबीची ही यादी चाहत्यांच्या पसंतीनुसार तयार केली आहे. अशा परिस्थितीत आता चाहत्यांनी अहान पांडेला नंबर १ स्थान दिले आहे. आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत अहान पांडे नंबर १ वर आहे. त्यांच्यानंतर ‘सैयारा’चे दिग्दर्शक मोहित सुरी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याच वेळी, चाहत्यांनी ‘सैयारा’ची अभिनेत्री अनिता पड्डा हिला तिसऱ्या क्रमांकावर निवडले आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकावर दिग्दर्शक मोहित सुरी असल्यामुळे चर्चेत आहेत.
‘पुष्पा २’ आणि ‘अॅनिमल’ला दिली टक्कर? ‘Saiyaara’ ने रचला इतिहास, बनवला नव्या रेकॉर्ड
मोहित सुरीने जिंकले चाहत्यांचा मन
‘सैयारा’चे कलाकार सध्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या आयएमडीबी यादीत अव्वल स्थानावर आहेत. तसेच, दिग्दर्शक मोहित सुरीची लोकप्रियता त्यांच्या चित्रपटातील अभिनेत्रीपेक्षा जास्त आहे. आता या यादीत अव्वल स्थानावर येणे ‘सैयारा’ टीमसाठी एक मोठे यश आहे. या सर्वांनी चित्रपटात खूप मेहनत घेतली आहे आणि आता त्यांना त्याचे फळ मिळत आहे. ‘सैयारा’ला चाहते चांगला प्रतिसाद देत आहेत. तसेच या चित्रपट आता किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.