(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
गोविंदाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. असं सांगितलं जात आहे की तो बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहेत, तेही सलमान खानसोबत. दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते. त्यांचा ‘पार्टनर’ चित्रपटसुद्धा ब्लॉकबस्टर ठरला होता. आता बातमी आहे की जवळपास दोन दशकांनंतर ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहे.
सलमान खान याने गोविंदासोबत काम करण्याबाबत ‘बिग बॉस १९’ मध्ये हिंट दिली होती. जेव्हा गोविंदाची पत्नी सुनीता शोमध्ये आल्या होत्या. मात्र, चाहत्यांना आता या प्रोजेक्टच्या अधिकृत घोषणेची आतुरतेने प्रतीक्षा आहे.
गोविंदाने सोशल मीडियावरही आपल्या कमबॅकची हिंट लोकांना दिली होती. त्यांनी फिल्म सिटीतील आपला एक फोटो शेअर केला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते, “नव्या सुरुवातीसाठी पूर्णपणे तयार.”
सलमानच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ते ‘बॅटल ऑफ गलवान’ या चित्रपटात दिसणार आहे, ज्यात तो आर्मी ऑफिसरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व लाखिया करत आहेत. काही दिवसांपूर्वी सलमानने लडाखमध्ये या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.
Bigg Boss 19: मृदुल तिवारीची ‘बिग बॉस’च्या घरातील संपली सत्ता, हे दोन्ही स्पर्धक बनले कॅप्टन्स
सलमान खान आणि गोविंदा शेवटचं एकत्र “पार्टनर” (2007) या सुपरहिट चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. मात्र त्यानंतर दोघांमध्ये काही मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या, आणि त्यामुळे ते पुन्हा एकत्र कोणत्याही चित्रपटात दिसले नाहीत. आता मात्र अशी चर्चा आहे की, सलमान खानच्या आगामी “Battle of Galwan” या चित्रपटात गोविंदा झळकू शकतात. या चित्रपटाची कथा 2020 मध्ये झालेल्या गलवान घाटीतील भारतीय सैनिकांच्या शौर्यगाथेवर आधारित आहे.






