नीतू चंद्राचा 'आखिरी सवाल' मध्ये काम करण्याचा अनुभव
या चित्रपटात दमदार कलाकारांची फळी आहे, ज्यामध्ये अभिनेत्री नीतू चंद्रा यांची महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी त्यांनी अशा कथेत काम करण्याबाबत आपले विचार मांडले, जी पडद्यापलीकडेही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहते. तसेच, त्यांनी संजय दत्त आणि नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला.
नीतूने व्यक्त केला अनुभव
‘आखिरी सवाल’मध्ये काम करण्याबाबत आपला प्रामाणिक दृष्टिकोन व्यक्त करताना नीतूने सांगितले की, “गेल्या काही वर्षांत माझा दृष्टिकोन बदलला आहे. आता मी केवळ भूमिकांच्या मागे धावत नाही, तर अशा कथांचा शोध घेते ज्या कायम तुमच्यासोबत राहतात. ‘आखिरी सवाल’ ही तशीच एक फिल्म आहे. हा फक्त सिनेमा नाही, तर असा प्रश्न आहे जो थिएटरमधील दिवे बंद झाल्यानंतरही तुमच्या मनात घोळत राहतो. इतक्या गंभीर आणि विचार करायला लावणाऱ्या चित्रपटाचा भाग होणं, फक्त प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा खूप अधिक समाधान देणारं आहे.”
संजय दत्त आणि अभिजीत मोहन वारंग यांच्यासोबत काम करण्याबाबत त्या म्हणाल्या,
“नॅशनल अवॉर्ड विजेते दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग, ज्यांची दृष्टी कथाकथनात एक दुर्मिळ खोली आणते, त्यांच्यासोबत काम करणं आणि संजय दत्तसारख्या दिग्गज अभिनेत्यासोबत स्क्रीन शेअर करणं हा खरोखरच परिवर्तन घडवणारा अनुभव होता. हे शिकण्याचं, पुढे जाण्याचं आणि स्वतःला पुन्हा शोधण्याचं एक प्रवास होतं.”
‘आखिरी सवाल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन नॅशनल अवॉर्ड विजेते फिल्ममेकर अभिजीत मोहन वारंग यांनी केले आहे. निखिल नंदा प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती निखिल नंदा आणि संजय दत्त यांनी केली असून, पुनीत नंदा, डॉ. दीपक सिंह, गौरव दुबे आणि उज्ज्वल आनंद हे सह-निर्माते आहेत. कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी यांनी लिहिले आहेत. हा चित्रपट ८ मे २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.






