अवघ्या सेकंदाच होत्याचं नव्हतं झालं! कोलंबियात विमान कोसळून लोकप्रिय गायकासह 6 जणांचा मृत्यू, थरारक VIDEO (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
लीबियाला मोठा धक्का! तुर्कीत विमान अपघातात आर्मी चीफसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, टेक-ऑफनंतर काही मिनिटांनी विमान अचानक रनवे जवळच्या भागात कोसळले आणि आगीच्या गोळ्यात रुपांतरित झाले. विमान पूर्णपणे जळबून खाक झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हे सिंगर येइसन जिमेनेझचे खासगी चार्टर विमान होते. जुआन जोस रोंडान या विमानातळावरुन उड्डाण घेतल्यानंतर हा अपघात घडला. कोलंबियाचा प्रसिद्ध सिंगर येइसन जिमेनेझ त्याच्या कॉन्सर्टसाठी मेडेलिनला निघाला होता. परंतु उड्डाणनंतर तांत्रिक बिघाडामुळे विमानाचा तोल गेला आणि कोसळले. विमान कोसळल्यानंतर आगीचा मोठा भडका उडाला.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पण विमानाला भीषण आग लागली होती. यामुळे विमानातील लोकांना वाचवता आले नाही. या विमानात एका पायलटसह सिंगर येइसन जिमेनेज आणि टीममधील इतर चार सदस्य होते. हे सर्वजण जागीच ठार झाले असून सध्या या अपघातामुळे संपूर्ण कोलंबियात शोकळकळा पसरली आहे. येइसन जिमेनेज हा आंतरराष्ट्रीय संगीतविश्वातील मोठा गायक होता. त्याचा चाहतावर्गही प्रचंड होता. त्याच्या मृत्यूने त्याच्या चाहत्यांना प्रचंड धक्क बसला आहे.
येइसन जिमेनेज याच्या मृत्यूने आंतरराष्ट्री संगीतविश्वाला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. अनेकांनी त्याच्या गाण्यांच्या आठवणीला उजाळा दिला आहे. लोकांनी भावुक प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी विमान अपघाताच्या व्हिडिओ पाहून दु:ख व्यक्त केले आहे. काळा कधी घात करेल सांगता येत नाही, असे लोकांनी म्हटले आहे. कोलंबियाच्या लोकप्रिय गायकाच्या मृत्यूने संपूर्ण देश दु:खात बुडाला आहे.
Uy no, cómo se va a morir Yeison Jiménez? que tristeza, QEPD pic.twitter.com/jTuIZWtXCm — S. Vanessa C. (@SaVanessCa) January 10, 2026
Odisha plane crash: चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात! पायलटसह 6 जण जखमी
Ans: कोलंबियाच्या बोयाका येथे प्रांतात जुआन जोस रोंडान या विमानातळाच्या रनवेजवळ हा अपघात घडला आहे.
Ans: कोलंबियाच्या लोकप्रिय गायक आणि गीतकार येइसन जिमेनेजचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Ans: येइसन जिमेनेजसह त्याच्या टीममधील इतर चार सदस्य आणि एका पायलचा म्हणजेच एकूण सहा जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे.






