(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
71st National Film Awards: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने अखेर आपल्या कारकिर्दीतला पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार पटकावला आहे. ‘जवान’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील दमदार अभिनयासाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा सन्मान देण्यात आला. दिल्लीतील विज्ञान भवनात पार पडलेल्या ७१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शाहरुखला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती.
यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार बॉलिवूडचा किंग शाहरूख खानला प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराने शाहरुखच्या ३३ वर्षांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अनेक बॉक्स ऑफिस हिट्स, अविस्मरणीय भूमिका आणि लाखो चाहत्यांच्या प्रेमानंतर, आता शाहरुखला अधिकृतरित्या भारत सरकारकडून अभिनयासाठी गौरवण्यात आलं आहे.
विक्रांत मॅसीला राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय पारितोषिक! ‘12th फेल’मधील अभिनयासाठी गौरव…
पुरस्कार वितरणावेळी शाहरुखचा खास अंदाज पाहायला मिळाला, पांढऱ्या केसांचा लुक, गॉगल आणि क्लासिक सूट घालून
तो पुरस्कार सोहळ्यासाठी पोहोचला होता, शाहरूखने मंचावर येताच प्रेक्षकांना नमस्कार केला, त्याच्या या कृतीने सगळ्यांचीच मनं जिंकली. शाहरुखचे या लूक मधील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.
Finally, National Award Winner Shri Shah Rukh Khan getting his first ever National Film Awards for Best Actor in a leading role in Jawan ❤️#Jawan #ShahRukhKhan #SRK #NationalFilmAwards #TeamShahRukhKhan #71NationalAwards pic.twitter.com/wb59qpCdsp — Team Shah Rukh Khan Fan Club (@teamsrkfc) September 23, 2025
जवान चित्रपट ७ सप्टेंबर २०२३ रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमात शाहरूखने दुहेरी भूमिका साकारली होती. चित्रपटाचं दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक अॅटली कुमार यांनी केलं होतं, ज्यांनी याआधीही अनेक सुपरहिट तमिळ सिनेमे केले आहेत. ‘जवान’ ही त्यांच्या हिंदीतील पहिली मोठी अॅक्शन फिल्म ठरली.
या चित्रपटात दीपिका पादुकोण हिने अभिनयाने सर्वांची मने जिंकली, तर नयनतारा हिच्या अभिनयाचीही प्रचंड चर्चा झाली. याशिवाय सान्या मल्होत्रा आणि विजय सेतुपती यांच्याही भूमिका महत्वाच्या ठरल्या. या चित्रपटात विजय सेतुपती याने खलनायकाची भूमिका जबरदस्त पद्धतीने साकारली होती.