(फोटो सौजन्य -इंस्टाग्राम)
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची मोठी सून श्लोका अंबानी अलीकडेच करीना कपूरचा धाकटा मुलगा जेह कपूरच्या वाढदिवसाच्या पार्टीत तिच्या मुलांसोबत उपस्थित दिसल्या आहेत. या बर्थडे पार्टीतील फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच मुकेश अंबानी यांची मोठी सून श्लोका अंबानी खूप सध्या दिसत आहेत. त्यांचा त्यांच्या मुलांसहचा व्हिडीओ आता इंटरनेटवर व्हायरल होत आहे. चाहत्यांचा या व्हिडीओला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच त्यांनी असे काही काम केले आहे जे पाहून लोक त्यांचे कौतुक करत आहेत.
श्लोका अंबानी त्यांच्या मुलांसोबत पार्टीमध्ये उपस्थित झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. या पार्टीला बॉलिवूड स्टार्सनी हजेरी लागली होती. या पार्टीत सहभागी होण्यासाठी अंबानी कुटुंबाची मोठी सून श्लोका अंबानी देखील तिच्या मुलांसह पोहोचली आहे. इथे, श्लोका गाडीतून उतरताच, पापाराझींनी तिचे फोटो काढायला सुरुवात केली. श्लोकाने साधा जीन्स आणि पांढरा टॉप घातला होता. हा साधेपणा पाहून लोकांनी त्याचे खूप कौतुक केले आहे.
Chhaava: ७२ तासांत ‘छावा’ ने मोडले ५ मोठे रेकॉर्ड; असं करणारा २०२५ मधील ठरला पहिलाच चित्रपट!
पार्टी संपल्यानंतर, श्लोका मुलांसोबत बाहेर पडली आणि एका व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. श्लोकाची मुले त्यांच्या रिटर्न गिफ्ट्स उघडण्यात व्यस्त होती आणि काही रॅपर्स रस्त्यावर पडले होते, जबाबदार आई आणि नागरिक म्हणून त्यांनी मुलांनी केलेला कचरा उचला आणि हे या व्हिडीओमध्ये कैद झाले. हा व्हिडीओ आणि त्यांचा साधेपण पाहून लोक त्यांच भरभरून कौतुक करत आहेत. पापाराझी वरिंदर चावलाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, श्लोका तिच्या मुलांसह, पृथ्वी आणि वेदासह कार्यक्रमस्थळावरून निघताना दिसत आहे. पृथ्वीने रॅपिंग पेपरचा काही तुकडा जमिनीवर फेकल्याचे तिने पाहिले, तिने ते पटकन उचलले आणि तिच्या कारकडे निघाली. इंटरनेटवर श्लोका अंबानीच्या या विचारशील कृतीचे कौतुक होत आहे.
सध्या लूकने चाहत्यांचे वेधले लक्ष
श्लोका साधी जीन्स आणि पांढरा टॉप घालून या पार्टीला उपस्थित राहिली. या सध्या लूकने चाहत्यांचे मन जिंकले. तिचा आकर्षक पांढरा टॉप सी न्यू यॉर्कचा आहे आणि त्याची किंमत $२६० (अंदाजे ₹२१,६००) आहे, तर तिचा स्टायलिश डेनिम पेटन जीन्सचा आहे आणि त्याची किंमत $४५० (अंदाजे ₹३७,४००) आहे. अशाप्रकारे तिच्या ट्रेंडी लूकची एकूण किंमत ₹५९,००० होती.