(फोटो सौजन्य - x अकाउंट)
अभिनेता प्रसाद ओक आज त्याच्या थाटात वाढदिवस साजरा करत आहे. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांकडून आणि मित्र परिवाराकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अभिनेता प्रसाद ओकने आतापर्यंत अनेक दर्जेदार चित्रपट देत प्रेक्षकांचं मनोरंजन केले आहे. आणि प्रेक्षकांनी देखील अभिनेत्यावर भरपूर प्रेम केले आहे. हिरकणी सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करुन प्रसाद दिग्दर्शक म्हणून देखील प्रेक्षकांच्या तितकाच पसंतीस पडला. हिरकणी या चित्रपटासाठी अभिनेत्याची पत्नी आणि अभिनेत्री मंजिरीने सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका निभावली होती. हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच आवडला.
अभिनेता प्रसाद ओकचा जन्म पुण्यात १७ फेब्रुवारी १९७२ साली झाला. तसेच अभिनेत्याने पुण्यातील भावे हायस्कूलमध्ये आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. पुढे प्रसादने पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयातून त्याने पदवीचे शिक्षण घेतले. प्रसादला लहानपणापासूनच अभिनयाची आवड निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या कुटूंबाला प्रसाद एक दिवस नक्कीच मोठा अभिनेता होईल असा विश्वास होता. प्रसादने आपल्या अभिनयाची आवड जपत पहिल्यांदा नाटकात काम केले. आणि यांनतर अभिनेत्याच्या कामाला सुरुवात झाली.
Oscar 2025 मध्ये हृतिक रोशनचा जलवा; १७ वर्षे जुन्या ‘या’ चित्रपटाची होणार स्पेशल स्क्रिनिंग
अभिनेता प्रसाद ओकने पहिल्या नाटकात श्रीराम लागू आणि निळू फुले या मोठ्या कलाकारांसह काम केले. या नाटकामुळे अभिनेत्याला १९९३ साली पहिली मालिका मिळाली. या मालिकेचे नाव ‘बंदीनी’ होते. या मालिकेला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले. प्रसादचीही पहिली मालिका चांगलीच चालली. या मालिकेनं अभिनेत्याला प्रसिद्धी मिळाली. यानंतर त्याने ‘अंधाराच्या पारंब्या’, ‘अवघाची संसार’, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’, ‘दामिनी’, ‘घरकुल’, ‘चार दिवस सासूचे’, ‘भांडा सौख्यभरे’, ‘समारंभ’, ‘असंभव’, ‘आभाळमाया’, ‘पिंपळपान’, ‘वादळवाट’, ‘होणार सून मी या घरची’ यासारख्या अनेक मालिकांमध्ये अभिनेत्याने काम केले.
Chhaava: ७२ तासांत ‘छावा’ ने मोडले ५ मोठे रेकॉर्ड; असं करणारा २०२५ मधील ठरला पहिलाच चित्रपट!
प्रसादचा सिनेप्रवास
मालीकेत राज्य केल्यानंतर अभिनेत्याने सिनेमासृष्टीत काम करण्यास सुरवात केली. प्रसाद ओकचा पहिला सिनेमा म्हणजे बॅरिस्टर. या सिनेमासह त्याने ऐका दाजिबा, एक डाव धोबी पछाड, लगे रहो मुन्नाभाई, कलियुग, जेहेर, जोशी की कांबळे, पकडापकडी, हरी माझी घरी, हिप हिप हुर्रे, खेळ मांडला, निर्मला, धतिंग धिंगाणा, बाळकडू, डॉक्टर रमाबाई, 7 रोशन व्हिला, शिकारी, आणि डॉ काशिनाथ घाणेकर, ये रे ये रे पैसा, पिकासु, हिरकणी, धुरळा अशा अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमात त्याने साकारलेली आनंद दिघे यांची भूमिका चांगलीच गाजली. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात देखील अभिनेत्याने चांगले काम केले. सहाय्यक दिग्दर्शक ते आघाडीचा अभिनेता हा प्रसाद ओकचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.