(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्रद्धा आर्य तिच्या अभिनयासह सोशल मीडियावर चाहत्यांना अपडेट देत असते. शनिवारी तिने तिच्या जुळ्या मुलांचा वाढदिवस साजरा केला. “कुंडली भाग्य” फेम श्रद्धा आर्यने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले. एका फोटोमध्ये ती तिच्या दोन्ही लहान मुलांना मांडीवर घेऊन हसत आहे, तर काही फोटो गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जुळ्या मुलांना जन्म दिल्याचे हॉस्पिटलमधील जुने फोटो आहेत. श्रद्धा आर्याने गेल्या वर्षी जुळ्यांना जन्म दिला होता. एक मुलगी आणि एक मुलगा यांचा जन्म झाला. 29 नोव्हेंबर रोजी तिची दोन्ही मुलं एक वर्षाची झाली. तिच्या लेकीचे नाव सिया आणि लेकाचे शौर्य आहे. तिने आता पहिल्या वाढदिवशी त्यांचा चेहरा सोशल मीडियावर दाखवला आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने चाहत्यांना सरप्राईज दिले आहे. पती राहुल नागलसोबत तिने हे फोटो शेअर केले आहेत.
त्या काळाची आठवण करून देत श्रद्धाने लिहिले, “एक वर्षापूर्वी मी पहिल्यांदाच एका शांत रुग्णालयाच्या खोलीत माझे संपूर्ण जग माझ्या हातात घेतले होते. त्या क्षणापासून माझे आयुष्य बदलले आहे आणि मीही बदलले आहे. मी तुझी आई झाल्यापासून एक वर्ष झाले आहे, त्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
पोस्ट शेअर केल्यानंतर, श्रद्धाच्या चाहत्यांनी आणि सह-कलाकारांनी कमेंट सेक्शनमध्ये प्रतिक्रिया आणि शुभेच्छांचा वर्षाव केला. प्रसिद्धीपासून दूर गेलेल्या या अभिनेत्रीने एका नौदला अधिकाऱ्याशी लग्न केले. २१ नोव्हेंबर २०२१ रोजी तिने राहुल नागलशी लग्न केले आणि २०२४ मध्ये त्यांच्या दोन मुलांचे जन्म झाले. या अभिनेत्रीला एक मुलगा आणि मुलगी, शौर्य आणि सिया आहे.
श्रद्धा आर्या ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. “प्रीता” फेम अभिनेत्रीने दूरदर्शनच्या “इंडियाज बेस्ट सिने स्टार्स की खोज” मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर ती “Ssshhh, फिर कोई है, भूत बांग्ला,” “मैं लक्ष्मी तेरे आंगन की,” “अमृत मंथन,” “जुनून: ऐसी नफरत तो कैसा इश्क,” “ड्रीम गर्ल,” आणि “कसम तेरे प्यार की” सारख्या हॉरर शोमध्ये दिसली. तिने “मझाक मजाक में” होस्ट देखील केले आहे.






