(फोटो सौजन्य - Instagram)
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने आता तिच्या ऐतिहासिक विजयाबद्दल एक अद्भुत पोस्ट शेअर केली आहे. आजचा दिवस सुष्मिता सेनसाठी खूप खास आहे. या दिवशी सुष्मिता सेनला मिस युनिव्हर्सचा किताब मिळाला. आता अभिनेत्रीच्या या मोठ्या यशाला ३१ वर्षे पूर्ण झाली आहेत. या आनंदाच्या प्रसंगी, सुष्मिता सेनने एक पोस्ट शेअर केली आहे आणि चाहत्यांना ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त माहिती दिली आहे. तसेच, काही जुने फोटो शेअर करून अभिनेत्रीने त्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या आहेत.
सुष्मिता सेनच्या विजयाला ३१ वर्षे पूर्ण
सुष्मिता सेनने तिच्या विजयाचे काही अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्रीच्या पोस्टमध्ये ते सर्व क्षण दिसत आहे. ज्यात ती खूप आनंदी आणि अभिमानास्पद वाटत आहे. डोक्यावर मुकुट घालून सुष्मिता सेनने संपूर्ण भारताला अभिमानाने गौरवले. आता या संस्मरणीय दिवसाची आठवण करून देत, सुष्मिता सेनने अनेक लोकांचे आभार मानले आहेत. अभिनेत्रीने तिच्या प्रवासाबद्दल काय म्हटले? हे आपण जाणून घेऊयात.
भारताच्या पहिल्या विजयाबद्दल अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
सुष्मिता सेनने लिहिले, ‘२१ मे १९९४, एक ऐतिहासिक विजय ज्याने एका १८ वर्षांच्या भारतीय मुलीला विश्वाची ओळख करून दिली!’ जिच्यासाठी सगळं शक्यतात जग बदलले, आशेची शक्ती, समावेशाची शक्ती, प्रेमाची उदारता अधोरेखित केली…. जगभर प्रवास करणे आणि काही सर्वात प्रेरणादायी लोकांना भेटण्याचे सौभाग्य लाभणे… खरोखरच जीवनाला परिभाषित करणारे आहे. देवाचे, आईचे आणि बाबांचे आभार. मिस युनिव्हर्समध्ये भारताच्या पहिल्या विजयाच्या ३१ व्या वर्धापन दिनानिमित्त अभिनंदन.’ असे लिहून अभिनेत्रीने हा क्षण [पुन्हा अनुभवला आहे.
कोण आहे रुची गुज्जर? जिने मोदींच्या फोटोचा हार घालून केली Cannes 2025 च्या रेड कार्पेटवर एन्ट्री
सुष्मिता सेनची पोस्ट झाली व्हायरल
सुष्मिता सेन यांनी पुढे लिहिले की, ‘माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाल्याने, मी तो नेहमीच अभिमानाने जपून ठेवेन!’ फिलीपिन्समधील माझ्या प्रियजनांनाही ३१ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. तुम्हा सर्वांचा विचार करत आहे आणि उत्सव साजरा करत आहे. अशक्य प्रकारच्या स्वप्नांसाठी…कारण मला माहिती आहे, विश्व आपल्या बाजूने कट रचत आहे, तसेच पुढे लिहिले ‘माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे’ असे अभिनेत्रीने म्हटले.