फोटो सौजन्य: @MrDemocratic_ (X.com)
बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच्या कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. अभिनेत्रीने आपले अभिनयाचे कौशल्य विविध चित्रपटातून दाखवले आहे. मात्र, जेव्हा तिचे लग्न फहाद अहमद सोबत झाले, तेव्हा मात्र तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. तसेच ती तिच्या काही वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत देखील आली. मात्र, आता तिला नव्हे तर तिच्या नवऱ्याला म्हणजेच फहाद अहमदला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या फहाद अहमदमुळे चर्चेत आहे. खरंतर, अभिनेत्री आणि तिचा पती फहादने ‘पती पत्नी और पंगा’ या टीव्ही शोमध्ये भाग घेतला आहे. ज्यामध्ये दोघांमधील केमिस्ट्री आणि फहादचा लूक सोशल मीडिया युझर्सना आवडला नाही. अशा परिस्थितीत काही युझर्सनी अभिनेत्रीच्या पतीवर आक्षेपार्ह कमेंट्सही केल्या. ज्याला स्वराने आता एका पोस्टद्वारे चोख उत्तर दिले आहे.
Raksha Bandhan 2025: भावाची कमतरता पूर्ण करतात या बॉलीवूड सिस्टर्स, बांधतात राखी करतात रक्षण
खरं तर, स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या ‘पती, पत्नी और पंगा’ शोमधील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावर युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. पण अभिनेत्रीला काही लोकांचे शब्द आवडले नाहीत आणि तिने त्यांच्या कमेंट्सचा स्क्रीनशॉट घेत, तो तिच्या एक्स अकाउंटवर शेअर केला.
पोस्टमध्ये लिहिले होते की, ‘परिणीती चोप्रा तिच्या पतीला पीआरसाठी टॉक शोमध्ये आणताना पाहून, आता स्वराही तेच करत आहे. तिने डोंगरी येथील तिच्या ‘छपरी’ पतीला एका रिॲलिटी शोमध्ये आणले. तिचा पती डोंगरी येथील रस्त्यावरील विक्रेत्यासारखा दिसतो.’
स्वरा भास्करने हा स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले, ‘स्वतःला अभिमानी हिंदू आणि आंबेडकरवादी म्हणवणारा हा मूर्ख कदाचित हे माहित नसेल की ‘छपरी’ हा एक जातीय कलंक आणि अपमानजनक शब्द आहे. जो ‘ठप्पर’ किंवा गवताच्या झोपड्या बांधणाऱ्या समुदायासाठी वापरला जातो. डोंगरी किंवा इतरत्र रस्त्यावरील विक्रेता असण्यात काहीही गैर नाही, तुमचे मन जातीयवादी आणि वर्गवादी कचरा आहे..’
तुम्हाला सांगतो की स्वरा भास्करने 2023 मध्ये फहाद अहमदसोबत लग्न केले. दोघेही आता एका मुलीचे पालक झाले आहेत. त्यांनी तिचे नाव राबिया ठेवले आहे.