(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर युनिव्हर्समधील ‘स्त्री’ आणि ‘स्त्री २’ हे चित्रपट प्रचंड हिट झाले आहेत. आता या युनिव्हर्सचा पुढचा चित्रपट येत आहे, ज्याचे नाव ‘थामा’ आहे. यामध्ये आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटातील दोघांचेही फर्स्ट लूक आधीच समोर आले आहेत. आज त्याचा टीझर देखील रिलीज झाला आहे. टीझर पाहून चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहेत.
‘थामा’ ही मॅडॉकच्या हॉरर-कॉमेडी विश्वातील पहिली प्रेमकथा
‘थामा’ चित्रपटाचा टीझर मॅडॉक फिल्म्सच्या यूट्यूब चॅनलवरून प्रदर्शित झाला आहे. ‘थामा’ हा दिनेश विजनच्या मॅडॉक फिल्म्सच्या हॉरर-कॉमेडी विश्वातील पहिला प्रेमकथा चित्रपट आहे. टीझरच्या सुरुवातीला आयुष्मान खुराना आणि रश्मिका जंगलात दाखवले आहेत. ‘तू माझ्याशिवाय जगू शकशील का? १०० वर्षे’ असा प्रश्न ऐकू येतो. उत्तर येते, ‘१०० वर्षांसाठी काय, एका क्षणासाठीही नाही विसरणार’.
प्रेमकथेसोबत रक्तरंजित खेळ देखील दिसणार
यानंतर, प्रत्येक प्रेमकथेत घडते तसे, टीझरमध्ये रश्मिका-आयुष्मानच्या प्रेमकथेमध्ये काही अडचणी येतात, ज्यामध्ये भयपट देखील समाविष्ट आहे. आयुष्मान जंगलात प्राण्यांशी लढतो. या चित्रपटामध्ये एक प्रेमकथा दाखवण्यात आली आहे. पण त्यात रक्तपात देखील आहे. आदित्य सरपोतदार यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली आहे. मॅडॉक फिल्म्सने एक इन्स्टाग्राम पोस्ट देखील शेअर केली आहे आणि टीझरबद्दल माहिती दिली आहे. त्यासोबत लिहिले आहे, ‘भीती कधीच इतकी शक्तिशाली नव्हती आणि प्रेम कधीच इतकी रक्तरंजित नव्हते’.
‘पंचायत’ मधील प्रल्हादचा आणि मलायकाचा आयटम नंबर
‘थामा’ चित्रपटाचा टीझर सुमारे १ मिनिट ४९ सेकंदांचा आहे. हा टीझर खूपच जबरदस्त आहे. या चित्रपटाच्या टीझरमध्ये मलायका अरोराच्या नृत्याची झलक देखील आहे, म्हणजेच प्रेक्षकांना चित्रपटात तिचा आयटम नंबर पाहायला मिळेल. याशिवाय ‘पंचायत’ मालिकेतील प्रल्हाद चा म्हणजेच अभिनेता फैसल मलिक देखील आहे. याशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि परेश रावल सारखे स्टार देखील ‘थामा’मध्ये मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे.