(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
सोनी लिव्हने अॅपलॉज एंटरटेनमेंट आणि कुकुनूर मुव्हीजच्या सहकार्याने ‘द हंट: द राजीव गांधी असासिनेशन केस’ ची सत्य कथा आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही वेब सिरीज पत्रकार अनिरुद्ध मित्रा यांच्या ‘नाइन्टी डे’ या सर्वाधिक विक्री होणाऱ्या पुस्तकावर आधारित आहे. नुकताच या सिरीजचा अधिकृत ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ज्याला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना पकडण्याची कहाणी
या मालिकेच्या ट्रेलरमध्ये एका फोन कॉलने ही कहाणी सुरू होते, ज्यामध्ये ‘राजीव गांधी जिवंत आहेत का’ असे विचारले जाते. त्यानंतर राजीव गांधींच्या हत्येची घटना समोर येते. मालिकेत या प्रकरणाचा तपास पुढे सुरू होतो. ही मालिका हेरगिरीचे जग, गुप्तहेर संस्थांच्या काही अपयशांचे तसेच न्यायाची अपेक्षा असलेल्या लोकांच्या भावनांचे सखोल चित्रण करते. अमित सियाल या मालिकेत डी.आर. कार्तिकेयनच्या भूमिकेत आहेत, त्यांनी एसआयटी प्रमुखाची भूमिका साकारली आहे. त्यांच्याशिवाय या मालिकेत साहिल वैद, भगवती पेरुमल, दानिश इक्बाल, गिरीश शर्मा, विद्युत गर्ग, शफीक मुस्तफा, अंजना बालाजी, बी साई दिनेश, श्रुती जयन, गौरी मेनन यांसारखे कलाकार आहेत. ही मालिका चित्रपट निर्माते नागेश कुकुनूर यांनी दिग्दर्शित केली आहे. रोहित बनावलीकर आणि श्रीराम राजन यांच्यासोबत नागेश यांनीही ती लिहिली आहे.
‘इश्क बावला’ गाणं झालं प्रदर्शित; कोक स्टुडिओ भारतचं हरियाणवी प्रेमगीत
‘मला बेपत्ता व्हायचे आहे…’ असे का म्हणाला अभिषेक बच्चन? भावनिक पोस्टमागील कारण झाले उघड
अमित सियाल यांनी मालिकेबद्दल काय म्हटले?
या मालिकेबद्दल अमित सियाल म्हणाले, ‘हे फक्त एक गुन्हेगारी नाटक नाही. ही कथा अशा लोकांची आहे ज्यांनी इतिहासाला एक वेगळा आकार दिला. प्रेक्षकांना मालिकेत शक्ती, दुःख आणि न्याय यासारख्या भावनांसह एक वेगळ्या प्रकारची कथा पाहायला मिळेल. या मालिकेत एक महत्त्वाची भूमिका साकारून मला या मालिकेचा भाग असल्याचा अभिमान आहे. इंस्टाग्राम पेजवर शेअर केलेल्या या मालिकेच्या ट्रेलरमध्ये वापरकर्ते या कथेचे कौतुक करत आहेत. प्रेक्षक ४ जुलैपासून सोनी लिव्हवर ‘द हंट: द राजीव गांधी असासिनेशन केस’ ही वेब सिरीज प्रदर्शित होणार आहे.