(फोटो सौजन्य - x अकाउंट)
बॉलिवूड अभिनेता विनीत कुमार सिंग सध्या त्याच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. ‘छावा’ मधील कवीच्या भूमिकेसाठी आणि ‘जाट’ चित्रपटामधील त्याच्या अभिनयासाठी या अभिनेत्याचे कौतुक झाले आहे. आता, लवकरच विनीतच्या घरी एक आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. विनीत आणि त्याची पत्नी रुचिरा सिंह लवकरच पालक होणार आहेत. हे गोंडस जोडपे त्यांच्या आयुष्यातील एका नवीन टप्प्यात पाऊल ठेवण्यास सज्ज आहे. लवकरच हे दोघेही त्यांच्या पहिल्या बाळाचे त्यांच्या आयुष्यात स्वागत करणार आहे.
पहिल्या बाळाची पाहत आहेत आतुरतेने वाट
विनीत कुमार सिंग यांनी हिंदुस्तान टाईम्सला ही आनंदाची बातमी दिली. विनित आणि रुचिरा यांचे लग्न नोव्हेंबर २०२१ मध्ये झाले आणि आता हे जोडपे त्यांचे कुटुंब वाढवण्यासाठी सज्ज झाले आहे. या खास क्षणाबद्दल बोलताना विनीत म्हणाला, ‘हा काळ आमच्यासाठी खूप खास आहे. आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत आणि आमच्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहोत. आयुष्यात बाळाचे स्वागत झाले की सगळं काही नवीन वाटतं आणि मला हा प्रत्येक क्षण जगायचा आहे.’ असं अभिनेत्याने या मुलाखतीत सांगितले आहे.
रुचिराने शेअर केला आनंद
रुचिराने हसत तिच्या भावना व्यक्त केल्या, ‘मी खूप आनंदी आहे. इतके काही घडत आहे की माझ्या भावना शिगेला पोहोचल्या आहेत. तिने सांगितले की गरोदरपणामुळे या दोघांचे जीवन अधिक व्यस्त झाले आहे. रुचिरा म्हणाली, ‘मी नेहमीच व्यस्त असते, म्हणून मी या व्यस्त वेळेचा आनंद घेत आहे.’ विनीत प्रेमळपणे म्हणाला, ‘मी रुचिराची पूर्ण काळजी घेण्याचा प्रयत्न करतो. मी माझे काम लवकर संपवतो आणि शक्य तितक्या लवकर घरी पोहोचतो. मी माझे वेळापत्रक अशा प्रकारे आखले आहे की मी तिच्यासोबत डॉक्टरकडे जाऊ शकेन. जुलैमध्ये बाळाच्या आगमनानंतर मी पितृत्व रजा घेण्याचा विचार करत आहे.’ असं अभिनेता म्हणाला.
यशाचे श्रेय न अभिनेत्याने दिले बाळाला
याचदरम्यान जर आपण अभिनेत्याच्या कारकिर्दीबद्दल सांगायचे झाले तर, २०२५ हे वर्ष विनीतसाठी खूप चांगले राहिले आहे. ‘मॅच फिक्सिंग’, ‘छावा’, ‘सुपरबॉईज ऑफ मालेगाव’ आणि अलीकडेच प्रदर्शित झालेले ‘जाट’ या त्यांच्या एकामागून एक चित्रपटांनी त्यांना खूप प्रशंसा मिळवून दिली. विनीत त्याच्या यशाचे श्रेय त्याच्या न जन्मलेल्या बाळाच्या नशिबाला देत आहे. तो हसला आणि म्हणाला, ‘असं वाटतंय की माझ्या बाळाचे नशीब माझ्यासोबत आहे.’