(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान सध्या चर्चेत आहे. त्याने नुकतीच “बॅड्स ऑफ बॉलीवूड” या वेब सिरीजद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. ही वेब सिरीज स्ट्रीमिंग सुरू होताच तो पुन्हा एकदा कायदेशीर वादात अडकलेला दिसतो आहे. आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यन खानविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याची आज सुनावणी होणार आहे.
समीर वानखेडे यांनी वेब सिरीजमध्ये हिंसाचार, वाईट वर्तन आणि नकारात्मक प्रतिमा दाखवल्याबद्दल आर्यन खानविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. रेड चिलीजच्या “बॅड्स ऑफ बॉलीवूड” या वेब सिरीजने ड्रग्ज विरोधी एजन्सी आणि कायदा अंमलबजावणी संस्थांची प्रतिमा खराब केली आहे आणि जनतेचा विश्वास तोडला आहे असा त्यांचा दावा आहे. आणि आज आर्यन खानच्या या वेब सिरीजप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
OG Collection: पवन कल्याणच्या ‘OG’ने तोडला ‘सैयारा’चा रेकॉर्ड, पहिल्याच दिवशी एवढी कमाई
भारतीय दंड संहितेच्या कलमांचे उल्लंघन
समीर वानखेडे म्हणाले की, या मालिकेत काही अश्लील आणि आक्षेपार्ह दृश्ये आहेत, विशेषतः ज्यामध्ये एक पात्र राष्ट्रीय चिन्हाचा, “सत्यमेव जयते” या घोषणेचा अपमान करते. हे माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांचे उल्लंघन करते. असे समीर वानखेडे यांचे म्हणणे आहे. आता या संपूर्ण प्रकरणात पुढे काय घडते हे पाहणे उत्कंठाचे होणार आहे.
२ कोटी रुपयांची केली मागणी
समीर वानखेडे यांच्या याचिकेत म्हटले आहे की, वेब सिरीजमध्ये त्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा अपमान करण्यात आला आहे. त्यांनी त्यांच्या याचिकेत शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, मेमोरियल बिल्डिंग आणि इतरांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी कोर्टाकडे वेब सिरीजवर कायमची बंदी घालण्याची आणि ₹२ कोटींची भरपाई मागितली आहे. त्यांनी भरपाईची रक्कम टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलला देण्याचा प्रस्तावही मांडला आहे.
समीर वानखेडे का आहेत नाराज?
आर्यन खानच्या दिग्दर्शनात पदार्पणात एक दृश्य होते ज्यामुळे नेटकऱ्यांना असे वाटले की सुपरस्टारच्या मुलाने २०२१ च्या ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीदरम्यान त्याला अटक केलेल्या माजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांच्याबद्दल टिप्पणी केली आहे. या दृश्यात, एक पोलिस अधिकारी एका भव्य पार्टीत प्रवेश करतो आणि एका व्यक्तीला सिगारेट ओढताना पाहतो. परंतु, तो माणूस बॉलीवूडचा नाही हे कळताच, अधिकारी रस गमावतो आणि त्याला जाऊ देतो.
जुबिन गर्ग यांच्या मृत्यूच्या प्रकरणाला आणखी धक्कादायक वळण, प्रसिद्ध संगीतकाराला केली अटक
ही सिरीज यापूर्वी वादात अडकली
ही सिरीज यापूर्वी कायदेशीर वादात अडकली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने मुंबई पोलिसांना अभिनेता रणबीर कपूर, वेब सिरीजचे निर्माते आणि नेटफ्लिक्स यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली आहे. हा खटला धूम्रपान नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित आहे. खरं तर, “बॅड्स ऑफ बॉलीवूड” मधील एका दृश्यात रणबीर कपूर ई-सिगारेट ओढताना दिसत आहे. या दृश्यात कोणताही लेखी इशारा दाखवण्यात आलेला नाही. या दृश्याबद्दल तक्रार करताना, विनय जोशी नावाच्या व्यक्तीने राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला पत्र लिहिले होते.