(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलिवूडसाठी २०२५ हे वर्ष अत्यंत दुःखद ठरत आहे. गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांच्या निधनानंतर लगेचच अभिनेता संजय खान यांच्या पत्नी आणि जायद खान यांच्या आई जरीन खान यांचे निधन झाले आहे. ८१ व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
जरीन खानच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच चाहत्यांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
त्यांच्या निधनाची बातमी मिळताच सुझान आणि झायेद यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी त्यांच्या कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी उपस्थित झाले होते. जया बच्चन, शबाना आझमी, बॉबी देओल यांच्याव्यतिरिक्त अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सुझान आणि झायेद यांच्या घरी उपस्थित होते. सुझान खानची आई झरीन यांच्यावर शुक्रवारी दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतील जुहू यथील स्मशानभूमीत त्यांच्यावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. जरीन खान यांच्या निधनाने अभिनेता जायद खान पूर्णपणे खचला आहे. त्यांच्या अंत्ययात्रेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना अनेक प्रश्न पडले आहेत. याचं कारण आता समोर आले आहे.
खूप कमी लोकांना माहिती आहे की जरीन खान या हिंदू होत्या. जरीन कतरक असे त्यांचे लग्नापूर्वीचे नाव होते. संजय खान यांच्याशी लग्न केल्यानंतरही त्यांनी धर्म बदलला नव्हता. म्हणू त्यांच्या इच्छेनुसारच हिंदु पद्धतीने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. झायेद खानने आईची ही शेवटची इच्छा पूर्ण केली आईच्या पार्थवाला अग्नी दिला.
पत्नीला अखेरचा निरोप देण्यासाठी अभिनेता संजय खान स्मशानभूमीत पोहोचले होते. पत्नीच्या निधनाने ते पूर्णपणे कोसळले होते, तेव्हा त्यांचे कुटुंबीय आणि मित्र त्यांना सावरताना दिसले.






