(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
प्रसिद्ध बॉलीवूड निर्माता-दिग्दर्शक आदित्य धर यांनी ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. १९ मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. विशेष म्हणजे, ‘धुरंधर २’ ने जगभरात १५०० कोटींहून अधिक कमाई करून आधीच अनेक मोठे विक्रम मोडले आहेत. ‘धुरंधर २’ च्या या प्रचंड यशानंतर, प्रसिद्ध विनोदी कलाकार झाकीर खानने बॉलीवूड इंडस्ट्रीवर निशाणा साधला असून अनेक व्यक्तींवर टीका केली आहे.
झाकीर खानने बॉलीवूडवर साधला निशाणा
झाकीर खान नुकताच एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होता. या कार्यक्रमादरम्यान, त्याने आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाच्या प्रचंड यशावरून बॉलीवूडवर टीका केली. तो म्हणाला, “तुम्ही कितीही अभिनंदनाच्या पोस्ट टाका. तुम्ही कितीही बातम्या प्रसिद्ध करा, कितीही सार्वजनिक मुलाखती द्या की हा तुमचा आवडता चित्रपट आहे, पण सत्य हे आहे की, मित्रांनो, प्रत्येकजण धुरंधरचा हेवा करत होता.” बघा, बॉम्बचा स्फोट लयारीमध्ये झाला, पण त्याचा धूर वांद्रे ते जुहू पर्यंत पसरला.’ असे म्हणून कॉमेडियनने टीका केली आहे.
झाकीर खानचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेक लोक त्याच्याशी सहमत आहेत. एका युझरने कमेंट केली, “भाऊ, त्याने कॅमेऱ्यासमोर अगदी खरं सांगितलं आहे.” झाकीर खानने जुहू-वांद्रेचाही उल्लेख केला, कारण तिथे बॉलीवूडमधील अनेक मोठे कलाकार राहतात.
Taapsee Pannu चा ‘गांधारी’मधून दमदार कमबॅक; VFX शिवाय अभिनेत्रीने साकारले खतरनाक स्टंट
‘धुरंधर २’ ने प्रेक्षकांना केले प्रभावित
आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने जगभरात ₹१,३०० कोटींहून अधिक कमाई केली. ‘धुरंधर’च्या यशानंतर, ‘धुरंधर २’ ने देखील आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ₹१,५०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी आणि अर्जुन रामपाल यांच्यासह इतर कलाकार देखील पाहायला मिळाले आहेत.






