(फोटो सौजन्य: Instagram)
नक्की काय घडलं?
व्हायरल व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती दागिण्यांच्या दुकानामध्ये अंगठी खरेदी करण्यासाठी आल्याचे दिसते. अंगठ्यांचे सॅम्पल्स चेक करत असतानाच तो अचानक एक अंगठी सराईतपणे आपल्या तोंडात टाकतो आणि मग दुसऱ्या अंगठ्यांवर आपली नजर टाकतो. सदर दृष्य पाहून त्याने चोरीच्या उद्देशाने सर्व प्रकार केल्याचे समजते. अंगठी गिळल्यानंतर जणू काही घडलंच नाही असं दर्शवत तो दुकानदारासोबत गप्पा मारतो आणि आणखी अंगठ्यांचे सॅम्पल्स पाहू लागतो. हे संपूर्ण दृष्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याचे घटना उघडकीस आली. यूजर्स व्हिडिओतील दृष्ये पाहून हैराण झाली असून त्याने नक्की असं का केलं असा सवाल आता नेटकऱ्यांकडून विचारला जात आहे.
View this post on Instagram
पाय गमावले, पण श्रद्धा नाही! कृत्रिम पायांच्या आधाराने महिलेने पूर्ण केली अमरनाथ यात्रा; Video Viral
दरम्यान व्हिडिओतील दृष्ये नक्की कुठली आहेत याची अधिकृत माहिती समोर आली नसून नवराष्ट्र व्हिडिओतील दाव्याची पुष्टी करत नाही. घटनेचा व्हिडिओ @elegance.jewellers नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “आणखी करा की एलपीजीच्या किमतीत वाढ! खुद्द देवही याच्या विरोधात आहेत!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सीसीटीव्ही नसता तर ही चोरी कदाचित कधीच समोर आली नसती”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “काही क्षणांच्या लालसेमुळे आयुष्यभराची अडचण ओढवू शकते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






