तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनन यांची मुख्य भूमिका असलेला ‘क्रू’ चित्रपट सध्या चर्चेता आहे. नुकताचं या चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला. प्रेक्षकांना हा ट्रेलर आवडला असून आता चित्रपट पाहण्याची उत्कंठा वाढली आहे. मात्र सेन्सॉर बोर्डाला हा ट्रेलर फारसा आवडलेला दिसत नाही आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजेच CBFC ने चित्रपटावर आक्षेप घेतचित्रपटातील अनेक आक्षेपार्ह दृश्ये कापली असून अनेक शब्द बदलले आहेत. चित्रपटात तब्बूला अनेक ठिकाणी शिवीगाळ करताना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे काही आक्षेपार्ह दृश्ये बदलण्यात आली आहेत.
[read_also content=”सिद्धू मूसवालाच्या आईने 58 व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कुटुंबियांनी शुभदीपचं केलं स्वागत! https://www.navarashtra.com/movies/charan-kaur-balkaur-singh-became-parents-sidhu-moosewala-younger-brother-shubhdeep-came-home-nrps-515912.html”]
‘क्रू’च्या ट्रेलरमध्ये एका क्षणी, एअर होस्टेसची भूमिका साकारणारी तब्बूचे आक्षेपार्ह संवाद बसलण्यात आले आहे. एका दृष्यात ती म्हणते, “बसा चू#&.” चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये हा संवाद बदलण्यात आला आहे. यामध्ये ‘चु#&’ ऐवजी ‘भूतिया’ वापरला आहे. क्रूची गाणी आणि टीझर आधीच रिलीज झाला होता. आता त्याचा ट्रेलर समोर आला आहे, ज्यामध्ये तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनॉनचे भन्नाट जोडी दिसत आहे . ते काम करत असलेली विमान कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे आणि तिन्ही एअरहोस्टेस तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतात. ट्रेलरमध्ये तिघांची केमिस्ट्री पाहायला मिळते. ट्रेलर खूपच मनोरंजक आहे आणि प्रेक्षकांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.
क्रूचे दिग्दर्शन राजेश ए. कृष्णन यांनी केले आहे, तर एकता कपूर, रिया कपूर आणि अनिल कपूर हे त्याचे निर्माते आहेत. या चित्रपटात तब्बू, करीना कपूर आणि क्रिती सेनॉन यांच्याशिवाय दिलजीत दोसांझ, कपिल शर्मा, राजेश शर्मा आणि सास्वत चॅटर्जी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 29 मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.