Chala Hawa Yeu Dya Actress Shreya Bugde Shared Special Post For Abhijeet Khandkekar On His Birthday
गेल्या काही दिवसांपासून ‘चला हवा येऊ द्या’ शो कमालीचा चर्चेत आहे. या शोचा आता लवकरच दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये काही नवीन चेहरे पाहायला मिळणार असून बाकीचे जुनेच कलाकार असणार आहेत. शोमध्ये होस्ट निलेश साबळेची जागा अभिनेता अभिजित खांडकेकर घेणार असून कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, गौरव मोरे, भारत गणेशपुरे आणि प्रियदर्शन जाधव हे कलाकार दिसणार आहेत. दरम्यान, आज अभिनेता अभिजित खांडकेकरचा वाढदिवस आहे. अभिजितच्या वाढदिवसानिमित्त श्रेयाने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.
स्वामींच्या बोरीवृक्षातून दिला जाणारा साक्षात्कार, अंगावर काटा आणणारा अनुभव
अभिजित आणि श्रेया हे दोघेही ‘चला हवा येऊ द्या २’ मध्ये एकत्र काम करणार आहेत. दोघेही आता एकाच कार्यक्रमात एकत्र काम करणार असल्याने श्रेया उत्सुक असल्याचं तिच्या पोस्टमधील कॅप्शनमधून दिसत आहे. श्रेया बुगडेने अभिजितच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर करीत त्याला खास कॅप्शनही दिली आहे. अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा अभी. मी केव्हातरी व्यक्त होत असते. आता मी लिहीत आहे. कारण मी खूप आनंदी आहे. मला फक्त तुला एवढंच सांगायचं आहे की, तू माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहेस. तू माझ्यासाठी देवदूत होतास. गेलं वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझी प्रकृती ठीक नव्हती, पण तू त्यावेळी मला खंबीरपणे साथ दिलीस.”
“तू खूप चांगला माणूस आहेस. कायम समोरच्या व्यक्तीच्या मदतीसाठी तू हजर असतोस. मी खूप नशीबवान आहे की, माझ्याकडे तुझ्यासारखा मित्र आहे. प्रत्येकाला तुझ्यासारखा मित्र मिळावा. यापुढे सुद्धा तुला असंच कायम इतरांना त्यांच्या कठीण काळात मदत करता यावी ही इच्छा. तुला चांगली कामं मिळत राहोत, तुझं आरोग्य उत्तम राहावं यासाठी शुभेच्छा. तुझ्यासोबत नवीन प्रोजेक्टमधून कामं करण्यासाठी आणि भन्नाट आठवणी तयार करण्यासाठी मी उत्सुक आहे. गेली अनेक वर्षे मी तुला ओळखत आहे. या वर्षांमध्ये तू कायम माझी साथ दिली आहेस. असाच पुढे जात राहा. खूप खूप प्रेम.” श्रेयाने शेअर केलेल्या पोस्टवर अभिजितनेही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “श्रेया, तू खूप छान आहेस. खूप खूप प्रेम”
‘पंचायत ४’च्या कलाकारांचं जबरदस्त फोटोशूट, हटक्या लूकमध्ये दिसली स्टारकास्ट