(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
धनुषचा चित्रपट इडली कढाई
धनुषचा “इडली कढाई” हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. तमिळ भाषेतील हा चित्रपट आता हिंदी डब आवृत्तीत ओटीटीवर प्रदर्शित झाला असून प्रदर्शित होताच प्रेक्षकांची मने जिंकत आहे. धनुषसोबत या चित्रपटात नित्या मेनन आणि शालिनी पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
धनुषचा चित्रपट १ ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. आता तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. बॉक्स ऑफिसवर, चित्रपटाने ५०.३३ कोटींची कमाई केली तर जगभरात ७१.६८ कोटींची कमाई केली आहे.
चित्रपटात, मुरुगन हा एक लहान शहरातील रहिवासी आहे ज्याला काहीतरी मोठे साध्य करण्याची इच्छा आहे. त्याच्या वडिलांचे इडली कढाई नावाचे एक दुकान आहे, जे एक लोकप्रिय नाष्टाचे दुकान आहे. मुरुगन या पलीकडे जाऊन आपला व्यवसाय वाढवण्याची स्वप्न बघतो. म्हणून, तो त्याचे दुकान सोडून काहीतरी नवीन करण्यासाठी निघतो. त्याला त्याच्या वडिलांच्या मृत्यूची बातमी मिळते आणि तो लवकरच परत येतो.
“इडली कढाई” हा चित्रपट एक कौटुंबिक ड्रामा असून त्यात सामाजिक संदेशही आहे. हा चित्रपट फक्त वडील-मुलाच्या नात्यावर आधारित नसून, स्वप्न, जबाबदारी आणि आत्मभान या भावनांवर प्रकाश टाकतो.दिग्दर्शकाने ग्रामीण आणि शहरी जीवनातील संघर्ष फारच सुंदररीत्या दाखवला आहे.






