दिग्दर्शन राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) आणि शाहरुख खानची (Shah Rukh Khan) जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर आली असून ‘डंकी’ (Dunki) चित्रपट गुरुवारी (31 डिसेंबर) ला रिलीज झाला. पठाण, जवान नंतर शाहरुख खानचा हा तिसरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. डंकी हा चित्रपट रिलीज होण्याआधी या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ होती. चित्रपट रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिाय येताना दिसत आहे. ‘डंकी’ या चित्रपटाच्या रिलीजच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे सुरुवातीचे आकडेही आले आहेत. जाणून घ्या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॅाक्स ऑफिसवर किती कमावले.
[read_also content=”बार्शी-धाराशिव मार्गावर एसटी बस आणि दुचाकीचा अपघात, तीन तरुण गाडी खाली चिरडून ठार! https://www.navarashtra.com/latest-news/3-people-died-in-barshi-dharashiv-accident-nrps-491002.html”]
डंकीनं रिलीज होण्याआधी अॅडवान्स बुकींगमध्येही 37 हजारांहून अधिक तिकीटांची विक्री करून या चित्रपटाने 1 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला होता. यावरुन चित्रपटाला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा भरुभरुन प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा होती. Sacknilk च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. मात्र, यापुर्वी रिलिज झालेल्या शाहरुख खानच्या पठाण आणि जवान या चित्रपटांच्या ओपनिंग-डे कलेक्शनपेक्षा डंकी या चित्रपटानं पहिल्या दिवशी कमी कमाई केल्याचं दिसत आहे. ‘जवान’ चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 75 कोटींचे कलेक्शन केलं होतं तर पठाण या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी 57 कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अॅनिमल या चित्रपटाचं ओपनिंग डे कलेक्शनही ‘डिंकी’पेक्षा जास्त होतं. अॅनिमलने पहिल्या दिवशी 60 कोटी कमावले होते. मात्र, डंकीला सोशल मीडियावर या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून वीकेंडमध्ये चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
जवान,पठाणनंतर शाहरुख खानचा या वर्षातील हा तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात शाहरुख खान, तापसी पन्नू, विकी कौशल, बोमन इराणी, विक्रम कोचर, अनिल ग्रोव्हर यांच्या प्रमुख भूमिका आहे. डंकीमध्ये चित्रपटाला प्रेक्षक आणि समिक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे. या चित्रपटात इंग्लडंला जाण्यचं स्वप्न बघणाऱ्या मित्रांची गोष्ट आहे. ज्यांच्याकडे व्हिजा,पासपोर्ट नसताना ते अवैध पद्धतीने इंग्लडंला जातात. या चित्पटात कॉमेडी आहे, खूप इमोशन आहे आणि थोडी अॅक्शनही आहे.