‘बिग बॉस मराठी’चा (Bigg Boss Marathi 4) चौथा सीझन अधिक रंजक बनवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नेहमी वेगवेगळे टास्ट बिग बॉसच्या घरातल्या सदस्यांना दिले जात असतात. अनेक सेलिब्रिटीही बिग बॉसच्या घरातल्या लोकांना भेटण्यासाठी येत असतात. आज बिग बॉसच्या घरात घरात एक नाही दोन नाही तर चार वाइल्ड कार्ड (Wild Card Entry) एन्ट्रीद्वारे तब्बल ४ चॅलेंजर्स आले आहेत. बिग बॉस मराठीच्या घरात राखी सावंत (Rakhi Sawant), विशाल निकम (Vishal Nikam), आरोह वेलणकर (Aroh Welankar), मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आहे.
“BIGG BOSS मराठी”, उद्या रात्री 10 वा. फक्त कलर्स मराठीवर आणि कधीही @justvoot वर.#ColorsMarathi #RangManalaBhidnare #BiggBossMarathi #BiggBossMarathiS4 #Season4 #BBMarathi pic.twitter.com/2i8ok9yP1x
— Colors Marathi (@ColorsMarathi) November 27, 2022
‘बिग बॉस मराठी’च्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमुळे सगळ्यांनाच मोठं सरप्राईज मिळालं आहे. बिग बॉसच्या घरात विशाल निकम, आरोह वेलणकर, मीरा जगन्नाथ आणि राखी सावंत यांच्या येण्यामुळे खेळात रंगत वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राखी सावंतने या आधी हिंदी ‘बिग बॉस’चे सिझन गाजवले आहेत. आता तिच्या येण्याने खेळाला तडका लागणार हे नक्की. घरात आलेले हे चॅलेंजर्स घरातील सदस्यांच्या खेळीला उलटवून लावणार ? घरात नवे ग्रुप तयार होणार? हे सगळं हळूहळू कळेलच.
[read_also content=”‘अथांग’ ने जिंकली प्रेक्षकांची मने, तेजस्विनी पंडितने व्यक्त केला आनंद,म्हणाली… https://www.navarashtra.com/entertainment/athang-becme-most-watched-webseries-on-planet-marathi-ott-tejaswini-pandit-expressed-her-feelings-nrsr-349067/”]
प्रोमोमध्ये चारही चॅलेंजर्सची एन्टी दाखवण्यात आली आहे. राखीची एन्ट्री होताच ती म्हणाली,“ शेवंते…” आणि अपूर्वाला हसू अनावर झालं. पुढे ती म्हणाली, “या सर्वांची आई आहे मी बिग बॉसची पहिली बायको… अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी इथे चालणार…”
दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरातून समृद्धी जाधवला बाहेर पडावे लागले. यंदाच्या पर्वातील बिग बॉसच्या घरातील पहिली कॅप्टन समृद्धी बनली होती. कलर्स मराठीवर रात्री १०.०० वाजता प्रेक्षकांना ४ चॅलेंजर्समुळे खेळात काय फरक पडणार हे पाहायला मिळेल.